Union Cabinet Decision: केंद्रीय मंत्रिमंडळाने राजपत्रित (Non Gazetted) नसलेल्या रेल्वे कर्मचाऱ्यांना 78 दिवसांच्या पगाराइतके उत्पादनक्षमता आधारित बोनस मंजूर केला आहे. केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी ही माहिती दिली. केंद्रीय मंत्री म्हणाले की, यामुळे सुमारे 11.56 लाख नॉन-गॅझेटेड रेल्वे कर्मचाऱ्यांना फायदा होईल. ते म्हणाले की, आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत दोन विभागांबाबत निर्णय घेण्यात आले. वर्षानुवर्षे, प्रोडक्टिविटी लिंक बोनस रेल्वेच्या राजपत्रित नसलेल्या कर्मचाऱ्यांना मिळत आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय घेण्यात आला आहे की, यावर्षीही रेल्वेच्या राजपत्रित नसलेल्या कर्मचाऱ्यांना 78 दिवसांचा बोनस दिला जाईल.
सोबकच त्यांनी सांगितले की 'पीएम मित्र योजना' सुरू केली जाईल जी कापड आणि वस्त्रांच्या क्षेत्रात मोठं योगदान देईल. यामुळे लाखो लोकांना रोजगार मिळेल. 5 वर्षात 4445 कोटी खर्च केले जातील. 7 मेगा इंटिग्रेटेड टेक्सटाईल रिजनल अँड अॅपरल (MITRA) पार्क त्यावर बांधण्यात येतील.
तसेच, केंद्रीय मंत्री पियुष गोयल म्हणाले की, RoSCTL ची योजना 2019 मध्ये सुरू करण्यात आली होती, जी 2024 पर्यंत वाढवण्यात आली आहे. यामुळे कापड क्षेत्रात निर्यातीबाबत उत्साह आहे. पीएम मित्र योजनेद्वारे सुमारे 7 लाख लोकांना प्रत्यक्ष रोजगार मिळेल आणि 14 लाख लोकांना अप्रत्यक्ष रोजगार मिळेल ही आमची कल्पना आहे. आतापर्यंत 10 राज्यांनी या योजनेसाठी स्वारस्य दाखवले आहे.
909 अप्रेंटिस पदांसाठी अर्ज प्रक्रिया सुरू
दक्षिण पश्चिम रेल्वे भरती 2021 अधिसूचना जारी करण्यात आली आहे. या भरती मोहिमेद्वारे एकूण 909 अप्रेंटिस पदांची भरती केली जाणार आहे. अर्ज करण्याची प्रक्रिया 4 ऑक्टोबरपासून सुरू झाली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार 3 नोव्हेंबर 2021 पर्यंत या पदांसाठी अर्ज करू शकतात. विविध शिकाऊ पदांच्या भरती प्रक्रियेविषयी अधिक माहिती rrchubli.in या संकेतस्थळावर मिळेल.
निवडलेल्या उमेदवारांना दक्षिण पश्चिम रेल्वेच्या विविध कार्यशाळा किंवा विभागांमध्ये नियुक्त केलेल्या ट्रेडवर प्रशिक्षण दिले जाईल. ज्या ट्रेडवर भरती झाली आहे त्यात फिटर, वेल्डर, इलेक्ट्रिशियन, मशीनिस्ट, सुतार, पेंटर, इलेक्ट्रिशियन आणि इतरांचा समावेश आहे.