Union Budget 2024: आज देशाच्या अर्थमंत्री निर्माला सीतारामन (Nirmala Sitharaman) यांनी मोदी सरकारचा 7 वा अर्थसंकल्प मांडला. यामध्ये शेतकरी, विद्यार्थी, युवकांसाठी रोजगार तसेच मध्यमवर्गीयांसाठी मोठ्या घोषणा करण्यात आल्या आहेत. आजचा अर्थसंकल्प (Union Budget 2024) मांडत असताना अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सामान्य आणि मध्यमवर्गीयांचे घराचे स्वप्न पुर्ण करण्यासंबधी मोठी घोषणा केली आहे.आजच्या अर्थसंकल्पात अर्थमंत्री (Union Budget 2024) सीतारामन यांनी, पीएम आवास योजनेंतर्गत 3 कोटी अतिरिक्त घरे बांधली जातील अशी घोषणा केली आहे. शहरांमधील गृहनिर्माण योजनेसाठी अर्थसंकल्पात 10 लाख कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. या अंतर्गत पीएम आवास योजना 2.0 साठी 10 लाख कोटी रुपये दिले जातील.


केंद्र सरकारकडून पुढील 5 वर्षांसाठी 2.2 लाख कोटी रुपयांचा वाटा टप्प्याटप्प्याने दिला जाईल. पीएम आवास योजना 2.0 अंतर्गत तीन कोटी नवीन घरे बांधली जाणार आहे, अशी घोषणा केली आहे. यामुळे आता मध्यम वर्गांचे घर घेण्याचं स्वप्न पुर्ण होणार आहे.


पीएम आवास योजनेंतर्गत आणखी 3 कोटी घरे बांधली जाणार 


आज (मंगळवारी) अर्थसंकल्प (Union Budget 2024) सादर करताना सरकारने प्रधानमंत्री आवास योजनेबाबतही मोठी घोषणा केली आहे. पीएम आवास योजनेंतर्गत 3 कोटी अतिरिक्त घरे बांधली जातील, असे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman) यांनी सांगितले. ही योजना ग्रामीण आणि शहरी दोन्ही भागांसाठी आहे.


घरे खरेदी करणाऱ्या महिलांवरील मुद्रांक शुल्कात कपात करण्याचा विचार: सीतारामन


अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज (मंगळवारी) अर्थसंकल्प (Union Budget 2024) मांडताना सांगितले की, सरकार महिलांच्या निवासी मालमत्तांच्या खरेदीवरील शुल्क कमी करण्याचा आणि शहरी विकास योजनांचा अनिवार्य घटक बनविण्याचा विचार करत आहे. 2024-25 या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प सादर करताना, सीतारामन (Nirmala Sitharaman) म्हणाल्या की, महिलांनी खरेदी केलेल्या मालमत्तेचे शुल्क कमी करण्यासाठी सरकार राज्यांना प्रोत्साहन देईल.


2024 च्या अर्थसंकल्पात रोजगार निर्मितीवर विशेष भर



मोदी सरकारच्या या अर्थसंकल्पात (Union Budget 2024) अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अनेक मोठ्या घोषणा केल्या आहेत. तरुणांचा कौशल्य विकास, शिक्षण, कृषी आणि रोजगार निर्मिती यासारख्या क्षेत्रांवर त्यांनी अर्थसंकल्पात विशेष लक्ष देण्यात आलेले आहे. देशाच्या पूर्वेकडील राज्यांना आर्थिक विकासाचे इंजिन बनवण्यासाठी विशेष योजनांची घोषणाही अर्थमंत्र्यांनी केली आहे. अर्थमंत्र्यांनी 11 वाजता अर्थसंकल्पीय भाषणाला सुरुवात केली.


बिहार आणि आंध्र प्रदेशसाठी अर्थसंकल्पात मोठी घोषणा



आजचा अर्थसंकल्प (Union Budget 2024) मांडत असताना अर्थमंत्री  निर्मला सीतारामन यांनी चंद्राबाबू नायडू मुख्यमंत्री असलेल्या आंध्र प्रदेशसाठी 15 हजार कोटींच्या निधीची तरतूद केली आहे. तर नितीश कुमार मुख्यमंत्री असलेल्या बिहारसाठी 26 हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. यासाठी अर्थमंत्र्यांनी दोन्ही राज्यांसाठी विशेष पॅकेज जाहीर करण्यात आले आहे.