Budget 2019 | सोनं, इंधन महागलं, काय-काय स्वस्त झालं?
एबीपी माझा वेब टीम | 05 Jul 2019 02:23 PM (IST)
सरकारने मध्यमवर्गींयांना करात कुठलीही नवी सूट दिली नाही. तर श्रीमंतांना मात्र मोदी सरकारने कर लावला आहे. शिवाय इंधन आणि सोन्यावर कर लावून महागाईला निमंत्रण दिलं आहे.
नवी दिल्ली : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आज (5 जुलै) देशाचा 2019-20 या वर्षाचा अर्थसंकल्प सादर केला. पण मध्यमवर्गीयांच्या हाती फार काही लागलं नाही. ज्या मध्यमवर्गीयांनी मोदी सरकारला मोठ्या अपेक्षेने निवडून दिलं होतं, त्यांच्या हाती या अर्थसंकल्पातून काहीच लागलेलं नाही. सरकारने मध्यमवर्गींयांना करात कुठलीही नवी सूट दिली नाही. तर श्रीमंतांना मात्र मोदी सरकारने कर लावला आहे. शिवाय इंधन आणि सोन्यावर कर लावून महागाईला निमंत्रण दिलं आहे. अर्थसंकल्पानंतर काय स्वस्त, काय महाग?महाग-