नवी दिल्ली : कोरोना संसर्गामधून पूर्णपणे सावरल्यानंतर अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनला तिहार तुरुंगात परत पाठवण्यात आले आहे. छोटा राजन यांना मंगळवारी एम्समधून डिस्चार्ज देण्यात आला. त्यानंतर त्याला पुन्हा तिहार तुरुंगात पाठविण्यात आल्याची माहिती अधिकाऱ्यांनी सांगितले.


अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजन यांना 22 एप्रिल रोजी कोरोना विषाणूची लागण झाली होती. त्यानंतर 24 एप्रिलला अखिल भारतीय वैद्यकीय विज्ञान संस्थेत (एम्स) दाखल करण्यात आले होते. एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, 61 वर्षीय राजन यांना मंगळवारी बरे झाल्यानंतर पुन्हा रुग्णालयातून तिहार तुरुंगात हलविण्यात आले.


2015 मध्ये राजनला इंडोनेशियातून प्रत्यार्पणानंतर तिहार जेलच्या उच्च सुरक्षा तुरूंगात ठेवण्यात आले आहे.