नवी दिल्ली : हाताच्या बोटांवरील रेषा अस्पष्ट झाल्यामुळे बायोमेट्रिकमध्ये ज्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे, त्यांना 'यूआयडीएआय'कडून दिलासा मिळणार आहे. 1 जुलै 2018 पासून अश्या व्यक्तींच्या चेहऱ्यावरुन नोंदणीकृत आधार कार्डाची पडताळणी केली जाणार आहे.
युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया (UIDAI) सध्या बोटांचे ठसे आणि डोळ्यांची बुब्बुळं (आयरिस) यांच्या आधारे पडताळणी करतं. मात्र वयोमान किंवा अतिरिक्त कामामुळे ज्यांच्या हाताच्या बोटांवरील रेषा (फिंगरप्रिंट्स) अस्पष्ट झाल्या आहेत, त्यांना ऑथेंटिकेशन करताना त्रासाला सामोरं जावं लागत आहे. त्यामुळे अशा व्यक्तींसाठी चेहराही त्यांचा 'आधार' ठरणार आहे.
चेहरा, बोटांचे ठसे, बुब्बुळं किंवा ओटीपी हे चार पर्यायांपैकी कोणत्याही एका पद्धतीने ऑथेंटिकेशन करता येईल.
सुप्रीम कोर्टात आधार कार्डावर होणाऱ्या सुनावणीच्या अवघ्या 24 तास आधी हा निर्णय जाहीर करण्यात आला आहे. आधार कार्डाच्या अनिवार्यतेवर दाखल केलेल्या याचिकेवर मंगळवारी सुनावणी होणार आहे.
आतापर्यंत देशातील 117 कोटी नागरिकांना आधार कार्ड जारी करण्यात आलं आहे.
आता चेहराही ठरणार 'आधार' पडताळणीचा पर्याय
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
15 Jan 2018 03:45 PM (IST)
वयोमान किंवा अतिरिक्त कामामुळे ज्यांच्या हाताच्या बोटांवरील रेषा (फिंगरप्रिंट्स) अस्पष्ट झाल्या आहेत, त्यांना ऑथेंटिकेशन करताना त्रासाला सामोरं जावं लागत आहे
फाईल फोटो
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -