मुंबई : इंडिगो एअरलाईन्स कंपनी गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने चर्चेत आहे. इंदूरला जाण्याचा बोर्डिंग पास मिळाल्यानंतरही प्रवाशाला नागपूरच्या विमानात पाठवण्याचा प्रताप इंडिगोने केला आहे.
6E-656 हे इंदूरला जाणारं विमान पकडण्यासाठी संबंधित प्रवासी दिल्ली विमानतळावर आला होता. तिकीटानुसार त्याला इंदूरचा बोर्डिंग पासही देण्यात आला. मात्र इंडिगोच्या सुरक्षा कर्मचाऱ्यांनी घोळ घातला. त्याला 6E-774 या नागपूरच्या दिशेने जाणाऱ्या विमानात त्या प्रवाशाला पाठवलं.
इंडिगोने आपली चूक मान्य केली असून घडलेल्या प्रकाराबद्दल खंत व्यक्त केली आहे. '6E774 दिल्ली-नागपूर विमानाच्या सुरक्षा कर्मचाऱ्याच्या हलगर्जीमुळे एका प्रवाशाला चुकून इंदूरऐवजी नागपूरला जावं लागलं.' असं इंडिगोने आपल्या पत्रकात म्हटलं आहे. संबंधित प्रवाशाला नंतर इंदूरला पोहचवण्याची व्यवस्था करण्यात आली, त्याचं बॅगेजही पाठवण्यात आलं, असं इंडिगोने सांगितलं.
पुढील चौकशी होईपर्यंत सुरक्षा विभागातील तीन अधिकाऱ्यांना तात्पुरतं निलंबित करण्यात आलं आहे.
इंडिगो एअरलाईन्सच्या सुरक्षा अधिकाऱ्याने एका वयस्कर प्रवाशासोबत केलेल्या गैरवर्तनाचा व्हिडिओ नोव्हेंबर महिन्यात व्हायरल झाला होता. त्यानंतर सर्वच स्तरातून यावर टीकेची झोड उठली होती.
जाना था इंदूर, पहुंच गये नागपूर, 'इंडिगो'चा प्रताप
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
15 Jan 2018 02:14 PM (IST)
संबंधित प्रवाशाला नंतर इंदूरला पोहचवण्याची व्यवस्था करण्यात आली, त्याचं बॅगेजही पाठवण्यात आलं, असं इंडिगोने सांगितलं.
प्रातिनिधिक फोटो
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -