UIDAI Changes : आपली ओळख पटवणासाठी महत्त्वाच्या ठरणाऱ्या अनेक ओळखपत्रांपैकी एक आधार कार्ड. याच आधार कार्डात काही बदल करायचे असतील तर यासंदर्भातील नियमांमध्ये काही बदल करण्यात आले आहेत. बऱ्याचदा आपण घर बदलतो. त्यामुळे आपला पत्ताही बदलतो. जर तुमचाही राहता पत्ता बदलला असेल आणि तुम्हाला आधार कार्डावर आपला बदललेला पत्ता अपडेट करायचा असेल, तर आज आम्ही तुम्हाला याची संपूर्ण प्रक्रिया सांगणार आहोत. 


UIDAI नं आधार कार्डावर पत्ता बदलण्याच्या नियमांमध्ये काही प्रमाणावर सूट दिली होती. पण आता नियमांमध्ये काही बदल केले आहेत. यापूर्वी ओळखीचा पुरावा सादर केल्याशिवाय आधार कार्डावरील पत्ता बदलणं शक्य होतं. पण आता आधार कार्डावरील पत्ता बदलण्यासाठी अॅड्रेस प्रूफ असणं अत्यंत आवश्यक असणार आहे. 



UIDAI नं काही दिवसांपूर्वी ट्वीट करत यासंदर्भातील माहिती दिली. ट्वीटमधून देण्यात आलेल्या माहितीनुसार, ओळखपत्राचा आणि पत्त्याच्या पुरावा सादर केल्याशिवाय पत्ता बदलता येणार नाही. त्यामुळे पत्ता बदलण्यापूर्वी पत्त्याच्या पुरावा सादर करावा लागणार. जाणून घेऊया आधार कार्डावरील पत्ता बदलण्याची संपूर्ण प्रक्रिया... 


ॲानलाइन अर्ज कसा कराल?


1. सर्वप्रथम UIDAI ची अधिकृत संकेतस्थळ uidai.gov.in वर जा.
2. Proceed To Update Aadhar Card यावर क्लिक करा.
3. त्यानंतर आधारकार्डवरील 12 अंकी नंबर तिथे प्रविष्ट करा.
4. सुरक्षेसाठी समोर आलेला कॅप्चा कोड नीट टाईप करा.
5. नंतर मोबाईल नंबर टाकून सेंड ओटीपीचा पर्याय येईल त्यावर क्लिक करून आलेला कोड तिथे टाकून एन्टर करा.
6. दिलेला मोबाईल नंबर हा आधारकार्डला लिंक असावा.
7. लॅाग इन केल्यानंतर आधारकार्डाची संपूर्ण माहिती तुमच्यासमोर असेल.
8. तिथे दिलेल्या 32 ओळखपत्रांपैकी कोणतंही एक सिलेक्ट करा आणि त्याची स्कॅन कॉपी अपलोड करुन सबमिट करा


ऑफलाईन अर्ज कसा कराल?


1. आपल्या जवळच्या आधारकार्ड केंद्रावर जा आणि आधारकार्ड अपडेट करण्यासाठीच्या अर्जाचा फॅार्म भरा.
2. त्यानंतर व्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला बायोमेट्रिक्स द्यावं लागेल.
3. ही प्रकिया पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला एक पावती मिळेल.  त्यावर असलेला रिक्वेस्ट नंबर (URN) वरुन तुम्ही तुमच्या आधार कार्डाचं स्टेटस ट्रॅक करु शकता.