UGC NET 2020 Cut Off: यूजीसी नेट परीक्षा 2020 चा कट ऑफ जाहीर झाला आहे. यामध्ये विद्यार्थी विषय आणि श्रेणीनुसार त्यांचे निकाल तपासू शकतात. तत्पूर्वी, नॅशनल टेस्टिंग एजन्सीने यूजीसी नेट परीक्षा 2020 चे अंतिम उत्तर अधिकृत वेबसाइटवर प्रसिद्ध केले होते. यावर्षी राष्ट्रीय पात्रता परीक्षा (NET) परीक्षा 24 सप्टेंबर ते 13 नोव्हेंबर दरम्यान घेण्यात आली आहे.
यावेळी सुमारे साडेआठ लाख विद्यार्थ्यांनी यूजीसी नेट परीक्षेसाठी नोंदणी केली होती, त्यापैकी सुमारे साडेपाच लाख उमेदवार परीक्षेला बसले होते. आपण यूजीसीच्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन अंतिम उत्तर डाउनलोड करू शकता जेणेकरून आपल्या उत्तराशी तपासणी होईल. यावेळी एनटीएने ही परीक्षा संगणक आधारित ठेवली होती. सर्व प्रमुख विषयांसाठी अंतिम कट ऑफ जाहीर करण्यात आले आहेत. आपण अधिकृत संकेतस्थळ nta.ac.in वर जाऊन आपली कटऑफ देखील तपासू शकता.
काही विषयांचे कट ऑफ
- हिंदी : कटऑफ टक्केवारी (जनरल - 97.22, ईडब्ल्यूएस 85.92, ओबीसी 91.76, एससी - 74.65, एसटी - 76.50)
- इंग्रजी - कटऑफ टक्केवारी (जनरल - 98.29, ईडब्ल्यूएस - 90.21, ओबीसी - 87.32, एससी -.79.96, एसटी - 75.27)
- कॉमर्स - कटऑफ टक्केवारी (जनरल - 95.63, ईडब्ल्यूएस- 85.21, ओबीसी- 88.32, एससी- 72.68, एसटी - 67.71)
- इकॉनोमिक्स - कटऑफ टक्केवारी (जनरल - 62.67, ईडब्ल्यूएस- 56.67, ओबीसी- 56.00, एससी- 50.67, एसटी- 49.33)
- पॉलिटिकल सायन्स - कटऑफ टक्केवारी (जनरल- 60.00, ईडब्ल्यूएस- 55.33, ओबीसी- 55.33, एससी- 50.67, एसटी- 50.00)
- हिस्ट्री - कटऑफ टक्केवारी (जनरल- 54.00, ईडब्ल्यूएस- 50.00, ओबीसी - 49.33, एससी- 46.00, एसटी- 44.67)
यूजीसी नेट म्हणजे काय?
यूजीसी नेट ही राष्ट्रीय पातळीवरील पात्रता परीक्षा आहे. मात्र, याची दोन उद्दीष्टे आहेत. पहिलं म्हणजे विद्यापीठात पीएचडीसाठी प्रवेश घेण्यास मदत होते. दुसरं विद्यापीठात सहाय्यक प्राध्यापक होण्यासाठी त्याची पात्रता आवश्यक आहे. नेट शिवाय प्राध्यापक होण्याचे स्वप्न पूर्ण करता येणार नाही. खास गोष्ट अशी म्हणजे एनटीए या परीक्षेचं आयोजन करते. यापूर्वी ही परीक्षा यूजीसी म्हणजेच विद्यापीठ अनुदान आयोगाने (UGC) घेत होते.
संबंधित बातमी :
UGC NET July 2020 Results Announced : यूजीसी नेट 2020 चा निकाल जाहीर; nta.ac.in वर निकाल पाहा