मुंबई : नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचे 18 खासदार निवडून आले आहेत. या 18 खासदारांना घेऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे अयोध्येल जाणार आहेत. 16 जून रोजी या दौऱ्याचे आयोजन करण्यात आले आहे. राम मंदिराचा मुद्दा घेऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मागील वर्षी नोव्हेंबर महिन्यात अयोध्या दौरा केला होता.
माजी खासदार आणि राम जन्मभूमी न्यासचे अध्यक्ष रामविलास वेदांती याबाबत म्हणाले की, केंद्रात पुन्हा एकदा एनडीएला पूर्ण बहुमत मिळाले आहे. नवे सरकार स्थापन झाले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा अयोध्येत येऊन आम्ही सरकारला राम मंदिराची आठवण करुन देऊ इच्छितो. उद्धव ठाकरेंच्या या दौऱ्याच्या माध्यमातून सरकारला त्यांचे वचन न विसरता राम मंदिराच्या बांधणीला सुरुवात करावी याची आठवण करुन दिली जाणार आहे. तसेच उद्धव ठाकरेंप्रमाणे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनीदेखील रामललांच्या दर्शनाला यायला हवे.
दरम्यान उद्धव ठाकरे यांनी नुकतेच नवनिर्वाचित खासदारांसह त्यांची कुलस्वामी कार्ल्याच्या एकवीरा देवीचे दर्शन घेतले होते. त्यानंतर काल (गुरुवारी) कोल्हापूरच्या अंबाबाईचेही दर्शन घेतले. त्यानंतर आता उद्धव ठाकरे सर्व खासदारांना घेऊन अयोध्येला जाणार आहेत.
शपथविधीपूर्वी नवनिर्वाचित खासदारांना घेऊन उद्धव ठाकरे अयोध्येला जाणार
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
07 Jun 2019 03:59 PM (IST)
नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचे 18 खासदार निवडून आले आहेत. या 18 खासदारांना घेऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे अयोध्येल जाणार आहेत.
Getty Images)
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -