मुंबई: 'आता भाईयो आणि मित्रो म्हणायला भीती वाटते. लोकं पळून जातात.' अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान मोदींवर उपहासात्मक टीका केली होती.


पत्रकार आणि लेखक प्रीतिश नंदी यांच्या 'रोअर ए वॉक थ्रू द वाईल्ड विथ कमल मोरार्का' या पुस्तकाचं उद्धव ठाकरे यांच्या हस्ते प्रकाशन झालं तेव्हा ते बोलत होते. मेट्रो कारशेड, पेग्विंन अशा मुद्द्यावर बोलतानाच उद्धव यांनी मोदींवरही चांगलंच तोंडसुख घेतलं.

काय म्हणाले उद्धव ठाकरे:

'आज काल हिंदीत बोलताना थोडीशी अडचण होते. पहिले मी हिंदीत बोलयाचे. तेव्हा सुरुवातीला म्हणायचे की, 'मित्रो किंवा भाईयो...' पण नंतर पाहिलं की, मित्रो आणि भाईयो म्हटलं की,  लोकं पळून जायचे. आता लोकं जेवढं वाघाला घाबरत नाही तेवढे या दोन शब्दांना घाबरतात.' अशी उपरोधिक टीका उद्धव ठाकरे यांनी केली.