पणजी (गोवा): आमचे मंत्री आजही खिशात राजीनामा घेऊन फिरतात. असं सूचक वक्तव्य शिवसेना पक्षाध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी केलं. गोव्यात एबीपी माझाला दिलेल्या विशेष मुलाखतीत उद्धव ठाकरेंनी गोव्यातील राजकारणाबाबतच महाराष्ट्रातील राजकारणावरही प्रश्नांची उत्तर दिली. पाहा नेमकं काय म्हणाले उद्धव ठाकरे.

प्रश्न: आज तुम्ही गोव्याच्या रणसंग्रामात उतरला आहात, भाजप शत्रू नंबर 1 असं शिवसैनिकांना वाटतं, तुम्हाला काय वाटतं?

उत्तर: महाराष्ट्राबाहेर आमची आजवर कुणाची युती नव्हती. गोव्यात पहिल्यांदाच आमची अशी युती होते आहे. महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष होता. बाळासाहेबांनी तेव्हा त्यांच्यासोबत युतीची इच्छा व्यक्त केली होती. पण त्यावेळी दुर्दैवाने युती झाली नव्हती. आज पहिल्यांदाच महाराष्ट्राच्या बाहेर आमची महायुती होत आहे. महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाला वापरुन आज जसं बाहेर फेकलं जात असल्याचं पाहून आम्ही एकत्र आलो आहोत.
गोव्याची जनता साधीभोळी आहे. विकासाच्या नावाखाली गोव्याची मूळ ओळख पुसण्याचा जर प्रयत्न होत असेल तर मात्र, गोव्याचं रक्षण करणं आमचं काम आहे. त्यामुळे आम्ही जागेबाबत खळखळ न करता आम्ही महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाच्या सोबत लढत आहोत.

प्रश्न: महायुतीचा मूळ गाभा हा प्रादेशिक अस्मिता आहे. महाराष्ट्रामध्ये मराठी भाषेला प्राधान्य असावं असं तुमचं म्हणणं आहे. गोव्यात कोंकणी भाषेला प्राधान्य दिलं जातं. इथं तुमचं काय मुद्दा आहे.

उत्तर: आपल्या देशामध्ये भाषावार प्रांतरचना झाली. भाषावार प्रांतरचना काही आम्ही नाही केली. प्रत्येक भाषेला आपला प्रांत मिळाला. त्या प्रांताला एक सरकार मिळालं. सहाजिकच आहे तिथल्या प्रांतातल्या भूमिपुत्रांचा मान-सन्मान राखला गेला पाहिजे. तो राखला जात नसेल तर त्यासाठी लढा दिला गेला पाहिजे.

प्रश्न: प्रादेशिक पक्षांना गिळंकृत करण्याचा भाजपचा प्रयत्न असतो. असं तुम्ही म्हणतात. त्याबाबत काय म्हणाल.


उत्तर:
  पहिले मी गैरसमज दूर करतो. की, मी भाजपच्या विरोधात मैदानात उतरलेलो नाही. जनतेसाठी उतरलो आहे. आम्ही आजवर महाराष्ट्राबाहेर फार काही निवडणुका लढवलेल्या नाही. गोव्यातही आम्ही 4 जागा लढवत होतो. त्यापैकी एक अर्ज बाद झाल्यानं आता 3 जागा लढवतो आहे. गोव्याचा मुख्यमंत्री आमच्या महायुतीचा असणार हे मला दिसणार. पण मी कुणा एका पक्षाच्या विरोधात नाही.

प्रश्न: भाजपविरोधात तुम्ही लढत नाही असं म्हणत असला तरी महाराष्ट्रात जी धुसफूस दिसते ती सर्वश्रुत आहे. हीच अपरिहार्यता आहे की, तुम्ही केंद्रात आणि राज्यात सत्तेत आहात?

उत्तर:  महाराष्ट्राचे जे विषय आहेत ते मी महाराष्ट्रात नक्की बोलेन. केंद्राचे विषय मी केंद्रात बोलेन

प्रश्न: सत्तेतून बाहेर पडणार? असा प्रश्न जनता विचारत आहे.

उत्तर: कोणी जनता मला असे प्रश्न विचारत नाही. तुम्ही विचारत आहात. मी जे निर्णय घेत आहे ते जनतेला आवडत आहे.

प्रश्न: तुमचे मंत्रीसुद्धा म्हणतात की, राजीनामा खिशात घेऊन फिरतात.

उत्तर: आहेत ना... त्यामुळे मलासुद्धा काही वेळापत्रकं कळतात. त्यामुळे माझ्या जनतेचा माझ्यावर विश्वास आहे. तिच्या मनातलं जे काही ते मी ओळखतो. त्यामुळे त्यांना आनंद होईल असंच काम मी करेन.

प्रश्न: गोव्यात तुमची महायुती झाली आहे.  महाराष्ट्रात शिवसेना-मनसे एकत्र का येऊ नये?

उत्तर:  गोव्यात आमची महायुती झाली आहे. त्यामुळे आज मी गोव्यापुरतं बोलेलं.

प्रश्न: महाराष्ट्रात जर जनेतेनं मागणी केली की, मनसे-शिवसेनेनं एकत्र यावं?

उत्तर:  जनता वैगरे तुम्हाला वाटतं. तुम्ही बोलता म्हणून तुम्हाला वाटतं. पण मी सुद्धा जनतेशी बोलतो. जनतेच्या मनात काय आहे हे मला माहिती आहे.

प्रश्न: पारदर्शकतेच्या मुद्द्यावर शिवसेना मागे हटली आणि भाजपशी युती तोडली असा आरोप होत आहे.

उत्तर: मी तीन तारखेनंतर याचं उत्तर देईल महाराष्ट्रामध्ये.

VIDEO:



संबंधित बातम्या:

शिवसेनेचा हुकमी एक्का भाजपमध्ये, नाना आंबोलेंचा जय महाराष्ट्र

मी महापालिका निवडणूक लढवणार नाही : शुभा राऊळ

शिवसैनिकांची बंडाळी मोडीत, किशोरी पेडणेकर यांना उमेदवारी

मुंबई महापालिकेसाठी शिवसेनेची पहिली यादी जाहीर

यादी जाहीर न करताच भाजपचे उमेदवारांना थेट अर्ज भरण्याचे आदेश : सूत्र

शिवसेनेसोबत युतीचा विषय संपला, स्वबळावर लढणार : राज ठाकरे