मुंबई: भारतीय लष्करानं पाकिस्तानाला चोख उत्तर दिल्यानंतर मोदी सरकारवर कौतुकाचा वर्षावर होतो आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही नरेंद्र मोदी यांना फोन करुन त्यांचं अभिनंदन केलं आहे. तर काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनीही पंतप्रधान नरेंद्र मोदींचं अभिनंदन केलं आहे. ऐवढंच नाही तर सोनिया गांधी यांनी सुषमा स्वराज यांचीही भेट घेतली. या मोहिमेत काँग्रेस पक्ष सरकारसोबत असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.
पाकव्याप्त काश्मीरमधल्या दहशतवाद्यांचे अड्डे उद्धवस्त करून भारतीय लष्करानं उरी दहशतवादी हल्ल्याचा बदला घेतला आहे. भारतीय लष्कराच्या या यशस्वी कामगिरीनंतर दिल्लीतल्या घडामोडींना चांगलाच वेग आला आहे.
पाकिस्तानच्या संभाव्य प्रतिहल्ल्याची शक्यता लक्षात घेऊन सीमेवरच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. सीमेवरच्या सर्व जवानांच्या सुट्टा रद्द करण्यात आल्या आहेत. तसंच सर्जिकल ऑपरेशनच्या पार्श्वभूमीवर दिल्लीतल्या नॉर्थ ब्लॉकमध्ये सर्वपक्षीय बैठक पार पडली. तर लष्कराच्या कारवाईनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींवर कौतुकाचा वर्षावर होतो आहे.