केंद्र सरकारच्या या निर्णयाचा फायदा सुमारे 33 लाख कर्मचाऱ्यांना होणार आहे. 2014-15 आणि 2015-16 असा दोन वर्षांपासून थकित असलेला बोनस कर्मचाऱ्यांना मिळणार आहे. हा बोनस सातव्या वेतन आयोगा अंतर्गत लागू होईल.
बिगरशेती कर्मचाऱ्यांचं किमान दैनिक वेतन 350 रुपयांपर्यंत वाढवण्याची घोषणाही यावेळी जेटलींनी केली. दररोज किमान 246 रुपये असलेल्या या वेतनात 104 रुपयांची घसघशीत वाढ करण्यात आली आहे.
https://twitter.com/ANI_news/status/770561930796920832