जम्मू-काश्मीरमध्ये लष्कराकडून दोन अतिरेक्यांना कंठस्नान
एबीपी माझा वेब टीम | 01 Feb 2019 10:06 AM (IST)
आज सकाळी जम्मू-काश्मीरच्या पुलवामा येथील राजपुरा परिसरात सुरक्षादल आणि अतिरेक्यांमध्ये चकमक झाली. या चकमकीत सुरक्षादलाने दोन अतिरेक्यांचा खात्मा केला आहे.
जम्मू : जम्मू-काश्मीर येथील पुलवामा परिसरात गेल्या काही महिन्यांपासून सुरक्षादल आणि अतिरेक्यांमध्ये सतत चकमकी घडत आहेत. आज सकाळी पुलवामा येथील राजपुरा परिसरात सुरक्षादल आणि अतिरेक्यांमध्ये चकमक झाली. या चकमकीत सुरक्षादलाने दोन अतिरेक्यांचा खात्मा केला आहे. शाहीद अहमद बाबा आणि अनियत अहमद झिगेर अशी मृत अतिरेक्यांची नावे आहेत. हे देन्ही अतिरेकी जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेचे सदस्य होते. मृत अतिरेक्यांकडून एक एसएलआर रायफल आणि पिस्तुल जप्त करण्यात आले आहे. या परिसरात अजूनही काही अतिरेकी लपलेले असण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळेच सुरक्षादलाकडून परिसरात शोध मोहीम सुरू करण्यात आली आहे.