काश्मीरच्या नौगाममध्ये 2 दहशतवाद्यांचा खात्मा, चकमकीत 2 जवान शहीद
एबीपी माझा वेब टीम | 21 May 2017 07:23 AM (IST)
श्रीनगर : जम्मू आणि काश्मीरच्या नौगाम भागात घुसखोरीचा प्रयत्न करताना 2 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. दहशतवाद्यांसोबत झालेल्या चकमकीत 2 जवानही शहीद झाले आहेत. काश्मीरच्या उत्तर भागात ही घुसखोरीची घटना घडली. कुपवाडा जिल्ह्यात नौगाम सेक्टरमध्ये भारतीय हद्दीत घुसखोरी करु पाहणाऱ्या दहशतवाद्यांच्या एका गटाला भारतीय सैनिकांनी हटकलं असता ही चकमक सुरू झाली. त्यातच दोन दहशतवाद्यांना मारण्यात आलं. दरम्यान गेल्या काही दिवसात काश्मीरमध्ये दहशतवादी कारवायांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. काही दिवसांपूर्वीच 27 एप्रिल रोजी कुपवाड्यात झालेल्या हल्ल्यात तीन जवान शहीद झाले होते. त्यानंतर 1 मे रोजी एटीएम कॅशव्हॅनवर दहशतवाद्यांनी हल्ला केला. यामध्येही पाच पोलीस शहीद झाले होते. तर दहशतवाद्यांनी 50 लाखांची रोकड लांबवली होती. शिवाय कुलगाम जिल्ह्यात झालेल्या हल्ल्यात एक पोलीस आणि तीन नागरिकांचा मृत्यू झाला होता. संबंधित बातम्या :