Norovirus : देशात कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा एकदा झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे पुन्हा एकदा नागरिकांच्या चिंतेत वाढ झाली आहे. यातच आणखी एक संकट येण्याची शक्यता आहे. केरळात नोरोव्हायरस या रोगाचे दोन रुग्ण आढळले आहेत. तिरुवनंतपुरमधील विझिंजममधील एका शाळेतील दोन मुलांना नोरोव्हायरस विषाणूची लागण झाली आहे.

  


मिळालेल्या माहितीनुसार, डायरिया आणि उल्टी झाल्यामुळे येथील 42 विद्यार्थ्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांचे नमुणे तपासले असता दोन जणांचा नोरोव्हायरस रिपोर्ट पॉझिटिव्ह असल्याचं समोर आलेय.  नोरोव्हायरसची लागण झालेले विद्यार्थी उचकाडा येथील एलएमएलपी शाळेत शिक्षण घेतात.  


केरळ राज्याच्या आरोग्य विभागाच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, 'दुषित खाणं आणि पाणी पिल्यामुळे नोरोव्हायरस विषाणूची लागण होते.  या आजाराचा प्रभाव दोन दिवसांपर्यंत राहू शकतो.  'नोरोव्हायरस झालेल्या व्यक्तीला डियहाड्रेशनचा त्रास होऊ शकतो. तसेच एक आठवडाभर आशक्तपणा येतो, असेही आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्याने सांगितले. दरम्यान, नोरोव्हायरसपासून बचाव करायचा असल्यासं नियमीत हात धुवावे लागतील. तसेच फळ आणि भाज्यांचा आहारात समावेश करावा. खाण्यापूर्वी या फळ-भाज्या कोमट पाण्यात स्वच्छ कराव्या लागतील, असेही आरोग्य विभागाकडून सांगण्यात आलेय. 


नोरोव्हायरस काय आहे?
नोरोव्हायरस हा एक संसर्गजन्य आजार आहे. नोरोव्हायरसमुळे उल्टी आणि डायरियाचा त्रास उद्भवतो.  त्याला सामन्यपणे 'विंटर वॉमिटिंग बग' म्हटले जाते.  CDC नुसार, नोरोव्हायरस सर्व वयाच्या लोकांना होऊ शकतो.  इन्फ्लुएंजा व्हायरसमुळे हा आजर पसरतो.  


कसा संसर्ग होतो? 
नोरोव्हायरस संक्रमित व्यक्तीच्या ड्रॉप्लेट्समुळे सहज पसरू शकतो. याचा एक अंश संपर्कात आलेल्या व्यक्तींला आजारी करु शकतो.  CDC नुसार, संक्रमित व्यक्तीच्या संपर्कात आलेल्याला नोरोव्हायरसची लागण होऊ शकते.  


लक्षण काय?
CDC नुसार, सबसे ज्यादा दिखने वाले लक्षण दस्त, उल्टी, मळमळ आणि पोटदुखी ही प्रमुख लक्षणे आहेत. त्यासोबत ताप, डोके दुखणे, अंग दुखणे यासारख्या समस्याही होऊ शकतात. 12 ते 48 तासानंतर नोरोव्हायरसची लक्षणे दिसतात.