नवी दिल्ली: देशाच्या राजधानी दिल्लीमध्ये दहशतवादी कृत्य आढळले आहे. जम्मू-काश्मीरसाठीचं कलम 370 हटवल्याने पाकिस्तानातही खळबळ सुरु झाली, याच कारणाने आयएसआय भारतावर हल्ला करणार असल्याची माहिती मिळाली आहे. गुप्तचर संस्थांना मिळालेल्या माहितीनुसार आयएसआयचे दोन दहशतवादी दिल्लीत घुसले आहेत.

दिल्लीत घुसखोरी केलेल्या या दोन दहशतवाद्यांचे स्केच तयार केल्याने त्यांचा शोध लागण्यास वेग मिळण्याची शक्यता आहे. दहशतवाद्यांबद्दल माहिती मिळाल्यानंतर दिल्लीत आयजीआय एअरपोर्टवर सुरक्षा वाढवण्यात आली.

आयएसआयचा भारतात मोठा घातपात घडवण्याचा कट, दोन अतिरेक्यांना दिल्लीत पाठवलं



याव्यतिरिक्त गुजरातच्या कांडला पोर्टवर दहशतवाद्यांना कमांडो ट्रेनिंगसाठी पाठवल्याची माहितीदेखील सुरक्षा एजन्सींना मिळाली आहे. दहशतवादी हल्ल्याची शक्यता लक्षात घेता सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. पाकिस्तानची गुप्तचर संघटना आयएसआयने भारतात मोठा घातपात घडवण्याचा कट आखल्याची शक्यता आहे.