नवी दिल्लीः राजधानी दिल्लीत 900 सील बंद SE आयफोन लुटल्याची घटना समोर आली आहे. बीटल कंपनीच्या डीलरकडून हे फोन्स गोदामाकडे नेले जात असताना रस्त्यातच चोरट्यांनी तब्बल अडीच कोटी रुपये किंमतीच्या फोनवर डल्ला मारला.



चोरट्यांनी गोदामापासून काही अंतरावरच ट्रक ड्रायव्हरच्या डोळ्यात मिरची पूड फेकली. गाडी थांबताच चालाकाला मारहाण करत ट्रक रस्त्यापासून दूर निर्जनस्थळी नेला. ट्रकमधील आयफोन चोरट्यांनी एका व्हॅनद्वारे लंपास केले. मात्र व्हॅनमध्ये जागा कमी असल्याने चोरट्यांना केवळ 984 आयफोनच पळवता आले.



पोलिसांनी ट्रक चालकाच्या मदतीने या प्रकरणाचा तपास सुरु केला आहे. कंपनीने काही दिवसांपूर्वीच चालकांना कामावरुन काढलं होतं. ज्यांना माल गोदामात कसा आणि कधी आणला जातो ही माहिती होती, अशी माहिती पोलिसांनी बीटल कंपनीशी संपर्क केली असता मिळाली. सीसीटीव्हीच्या आधारे पोलिसांनी दरोडेखोरांचा शोध लावला असून 900 आयफोन जप्त केले आहेत.