हैदराबाद : मराठवाड्यासह आंध्र प्रदेशात पावसाने धुमाकूळ घातला आहे. पावसाच्या पाण्याचा प्रवाह इतका भीषण आहे की, त्यामुळे रेल्वेट्रॅक वाकला आहे. त्यामुळे आंध्र प्रदेशातील विकाराबाद- सदाशिवपेठ दरम्यान रेल्वे मार्ग वाहून गेल्यामुळे, काही गाड्या रद्द, तर काही अंशतः रद्द करण्यात आल्या आहेत.
आज झालेल्या पावसामुळे विकाराबाद-सदाशिव पेठ दरम्यान एका ठिकाणी रेल्वे ट्रॅक वाहून गेला. यामुळे काही गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत तर काही अंशतः रद्द करण्यात आल्या आहेत त्या पुढील प्रमाणे –
रद्द करण्यात आलेली गाडी – गाडी क्रमांक 57550 औरंगाबाद-हैदराबाद ही सवारी गाडी औरंगाबाद येथून 15.35 वाजता रद्द करण्यात आली आहे.
अंशतः रद्द करण्यात आलेल्या गाड्या –
१) गाडी क्रमांक 57548 पूर्णा- हैदराबाद पसेंजर पूर्णा येथून 15/9/2016 रोजी सुटलेली गाडी बिदर ते हैदराबाद दरम्यान रद्द करण्यात आली आहे. ही गाडी क्रमांक 57547 बनून बिदर ते पूर्णा दरम्यान धावेल.
२) गाडी क्रमांक 57547 हैदराबाद ते पूर्णा सवारी गाडी दिनांक १५/९ रोजी हैदराबाद येथून सुटलेली गाडी विकाराबाद ते पूर्णा दरम्यान रद्द करण्यात आली आहे तर हीच गाडी क्रमांक 57548८ बनून विकाराबाद ते हैदराबाद दरम्यान धावेल.
वळविण्यात आलेल्या गाड्या –
१) दिनांक 14/9 रोजी सुटलेली गाडी संख्या 16594 बंगलोर-नांदेड एक्स्प्रेस ही सिकंदराबाद, मुदखेड मार्गे वळविण्यात आली आहे.