मुंबई : उरी हल्ल्यानंतर आक्रमक झालेल्या भारताने थेट पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून हल्ला चढवला आहे. भारतीय जवानांनी सर्जिकल स्ट्राईक्स अर्थात दहशतवाद्यांच्या तळावर हल्ला करुन, अनेक अतिरेक्यांचा खात्मा केला, अशी माहिती आज डीजीएमओ रणबीर सिंह यांनी दिली.
भारतीय जवानांच्या या हल्ल्यानंतर देशभरात जल्लोष साजरा करण्यात येत आहे. अनेकांनी ट्विटरवरुनही आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
भारत हा कणखर देश आहे, इथे दहशतवादाला थारा नाही हे पंतप्रधान मोदींनी दाखवून दिलंय. संपूर्ण देशाला भारतीय लष्कर आणि पंतप्रधान मोदींचा अभिमान आहे, असं ट्विट मुख्यमंत्र्यांनी केलं आहे.

https://twitter.com/Dev_Fadnavis/status/781411882800324609
वीरेंद्र सेहवाग
इंडियन आर्मीला सॅल्युट, द बॉईज हॅव प्लेड रिअली वेल, जय हिंद

https://twitter.com/virendersehwag/status/781411315587964929
अरविंद केजरीवाल
भारत माता की जय। पूरा देश भारतीय सेना के साथ है

https://twitter.com/ArvindKejriwal/status/781395605104885760
किरण बेदी
आपण शांत आणि सुरक्षीत झोपावं, यासाठी भारतीय जवान सीमेवर जागता पहारा देत असतात. भारताला आणखी कणखर बनवण्यासाठी आपली जबाबदारी पार पाडू

https://twitter.com/thekiranbedi/status/781415540338233344
अमित शाह
भारत कधीही दहशतवादाला घाबरणार नाही, हे भारतीय जवान आणि पंतप्रधान मोदींनी दाखवून दिलंय. भारतीय लष्कराला सॅल्युट

https://twitter.com/AmitShah/status/781407786810781696