मुंबई : सध्या सोशल मिडीयावर एक फोटो व्हायरल होत आहे आणि सर्वत्र या फोटोची चर्चा सुरू आहे. हा फोटो भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि प्रसिद्ध गुंतवणूकदार राकेश झुनझुनवाला यांची. शेअर मार्केटचे दिग्गज गुंतवणूकदार राकेश झुनझुनवाला यांनी काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दिल्लीत भेट घेतली. या भेटीबद्दलची माहिती स्वतः पंतप्रधानांनी एक फोटो ट्वीट करून दिली. या वेळी झुनझुनवाला यांच्या अर्धांगिनी रेखा झुनझुनवाला देखील उपस्थित होत्या. 


 


फोटो पाहताच नेटकरी देखील अवाक झाले आणि चुरगळलेला शर्ट घातलेला हा माणूस कोण हा प्रश्न सर्वांच्याच मनात निर्माण झाला. या फोटोवर अनेक युजर्सने देखील तुफान प्रतिक्रिया दिल्या आहेत. चुरगळलेला व अस्ताव्यस्त शर्ट पाहून काहींनी राकेश झुनझुनवाला यांना नवीन इस्त्री घेण्याचा सल्ला दिला, तर काहींनी झुनझुनवाला मोदींना भेटण्यासाठी विरार लोकलने गेले असावे असा देखील तर्क लावला. 



मोदींनी आपल्या ट्वीटमध्ये झुनझुनवाला फार आक्रमक भारतीय असल्याचं म्हटलंय. वन अँड ओन्ली राकेश झुनझुनवाला यांना भेटून आनंद झाला. ते एक उत्साही, आनंदी आणि उज्ज्वल भारतासाठी आग्रही असल्याचं पंतप्रधान मोदी यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलंय. 


राकेश झुनझुनवाला हे देशातील आघाडीचे गुंतवणूकदार असल्याने ही ‘सहज’ घेतलेली भेट नक्कीच महत्त्वपूर्ण आहे.  2014 साली देशात सत्तापालट झाल्यापासून झुनझुनवाला हे मोदींचे प्रशंसक असल्याचं दिसून येतं आणि त्यांनी वेळोवेळी मोदी सरकारच्या निर्णयांचं देखील स्वागत केलं आहे. विदेशी गुंतवणूकदारांना ते नेहमी भारतात गुंतवणूक करण्याचा सल्ला देतात.. आवाहन करतात.


राकेश झुनझुनवाला यांचं वार्षिक उत्पन्न 5.7 बिलियन डॉलर्स (42,782 करोड) इतकं आहे. काहीच महिन्यांपूर्वी झुनझुनवाला  यांनी त्यांच्या ‘अक्सा एअर’ या विमान कंपनीची देखील घोषणा केली होती. त्यासाठी झुनझुनवाला 70 विमानांसाठी पुढच्या चार वर्षात 35 मिलियन डॉलर्सची (262 करोड 68 लाख)  गुंतवणूक करणार असल्याचं जाहीर केलं होतं. एका विमानाची क्षमता 180 प्रवाशांची आहे. या विमानांच्या ताफ्यात Boeing 737 Max चा देखील समावेश असू शकतो.


झुनझुनवाला हे एव्हिएशन इंडस्ट्रीबद्दल फार आशावादी असून भारतीयांना कमी दरात विमान सेवा उपलब्ध करुन देणं हे त्यांचे ध्येयं असल्याचं नेहमीच सांगतात. हे स्वप्न साकारण्यासाठी सरकारचाही मोठा वाटा असेल, त्यामुळे मोदी -  झुनझुनवाला भेट एका ट्वीटपुरती मर्यादित नसून फार महत्त्वाची आहे.  


 


कोण आहेत राकेश झुनझुनवाला..


- राकेश झुनझुनवाला यांचा जन्म 1960 साली हैदराबाद येथे झाला व गेली तीन दशकं ते शेअर मार्केट मध्ये कार्यरत आहेत. 


- 1985 साली पहिल्यांदा त्यांनी 5000 रुपये गुंतवून शेअर मार्केटमध्ये आपली सुरुवात केली होती. 


- झुनझुनवाला हे एक Charted Accountant आहेत व त्यांचे वडील हे आयकर अधिकारी होते. 


- टायटन कंपनीचे झुनझुनवाला यांच्याकडे 7000 करोड रुपयांचे शेअर्स आहेत.


- राकेश झुनझुनवाला यांना शेअर मार्केटचा बादशाह समजलं जातं व त्यांच्या बारीक-सारीक हालचालींवर देखील साऱ्या देशाचं लक्ष्य असतं. 


- त्यांनी विकत घेतलेल्या शेअर नक्कीच प्रगती करणार असा विश्वास सामान्य माणसांमध्ये आहे.


 


"पीएम आवास योजनेअंतर्गत बहुतेक घरांची मालकी महिलांना मिळाली" : PM Narendra Modi