नवी दिल्ली : जगभरात ट्विटरची सेवा गेल्या अर्ध्यातासापासून ठप्प झाल्याने नेटकऱ्यांचा हिरमोड झाला. ट्विटर डाऊन झाल्याने अनेक युजर्सना याचा फटका बसला असून, ट्विटर अकाऊंटवरील अपडेट दिसत नसल्याच्या तक्रारी केल्या त्यानंतक अर्ध्या तासात म्हणजे रात्री 11.30 वाजता ट्विटरची सेवा पूर्ववत झाली आहे.   ट्विटरची सेवा ठप्प होण्यामागे नेमकी कारणे कोणती होती हे मात्र स्पष्ट होऊ शकले नाही.


दरम्यान ट्विटर पूर्णपणे नाहीतर अंशत: डाऊन झाले आहे. काही यूजर्सना याचा फटका बसला . तर काही यूजर्स सहजपणे ट्विटर वापरता येत होते. त्यानंतर ट्विटरवर देखील ट्विटर डाऊनची चर्चा सुरू होती. यावर काही यूजर्सचा उत्तर हो तर काही यूजर्सचे उत्तर नाही असे होते.  शुक्रवारी  रात्री 11 च्या दरम्यान ट्विटरवर ट्वीट करण्यास अडथळा येऊ लागला. त्यानंतर रिफ्रेश करूनही माहिती अपडेट होत नसल्याचं दिसून आलं. युजर्सकडून ट्विटर डाऊन झाल्याच्या तक्रारी करण्यात आल्या.  अमेरिकेसह जगभरातील  अनेक देशांना याचा फटका बसला आहे.


ट्विटरची सेवा ठप्प होण्यामागे नेमकी कारणे कोणती होती हे मात्र स्पष्ट होऊ शकले नाही. ट्विटर डाऊन झाल्याने भारतातील लोक सतत हे ट्विटर अकाउंट सुरू झाले का याची तपासणी करत होते. भारतात ट्विटर युजची संख्या मोठी असल्याने भारतातील युजरवर ट्विटर ठप्प झाल्याचा मोठा परिणाम होत असतो. ट्विटर ठप्प होण्याची ही पहिली वेळ नसून यापूर्वी देखील ट्विटर डाऊन झाले होते.  ट्विटरची सुरुवात 21 मार्च 2006 ला झाली आहे.


 काही दिवसांपूर्वी मायक्रो-ब्लॉगिंग साईट ट्विटरने  युजर्सना अधिक शब्दांची पोस्ट शेअर करण्याचा पर्याय उपलब्ध केला आहे. याचा अर्थ ट्विटसाठी निश्चित केलेली शब्दमर्यादा हटवली जाणार आहे. म्हणजेच, तुम्ही 280 शब्दांपेक्षा जास्त शब्दांचे ट्विट करू शकणार आहे.   ज्याद्वारे तुम्ही आता ट्विटरवर मोठे लेख पोस्ट करू शकाल. कंपनीकडून या फिचरची चाचणी सध्या सुरू आहे. लवकरच हे फीचर सर्वांसाठी रिलीझ केले जाणार आहे. 


इतर महत्त्वाच्या बातम्या :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha