मुंबई : सुप्रसिद्ध गीतकार आणि पटकथा लेखक जावेद अख्तर यांनी तिहेरी तलाक प्रथेवर सडेतोड भूमिका घेतली आहे. तिहेरी तलाकची प्रथा बंद व्हायला हवी, या मताचे जावेद अख्तर आहेत.

तिहेरी तलाक प्रथा कायद्याने बंद करायला हवी. शिवाय, तिहेरी तलाक प्रथा गुन्हा असल्याचेही घोषित करायला हवे, असेही जावेद अख्तर यांचे मत आहे.

https://twitter.com/Javedakhtarjadu/status/866872825604448257

जावेद अख्तर यांनी ट्वीट करुन म्हटले की, “ऑल इंडिया मुस्लीम पर्सनल लॉ बोर्डवर विश्वास ठेवला जाऊ शकत नाही. कारण ते फक्त या प्रकरणाला नवं वळण देण्याचे प्रयत्न करत आहेत. तिहेरी तलाक प्रथेला कायद्याने बंद करण्याची गरज आहे आणि गुन्हा म्हणून घोषित करण्याची गरज आहे.”

तिहेरी तलाक प्रथेचं समर्थन करणाऱ्या ऑल इंडिया मुस्लीम पर्सनल लॉ बोर्डवर गेल्या वर्षीही जावेद अख्तर यांनी जोरदार टीका केली होती.