लुधियाना : हिंदी सिनेसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री शबाना आझमी यांनी मुस्लीम समाजातील तिहेरी तलाकच्या प्रथेवर सडकून टीका केली आहे. तिहरी तलाकची प्रथा अमानवी असून, या प्रथेमुळे मुस्लीम महिलांच्या मुलभूत अधिकारांचं उल्लंघन होतं, असे शबाना आझमी म्हणाल्या.
मुस्लीम महिलांच्या अधिकारांचं रक्षण करणं सरकारचं कर्तव्य आहे आणि तिहेरी तलाकची प्रथा बंद करण्याच्या मुद्द्यावर कोणतेही दुमत असायला नको, असेही शबाना आझमी म्हणाल्या.
“तीन तलाक अमानवी असून, या प्रथेमुळे मुस्लीम महिला समानता आणि सशक्तीकरणापासून वंचित राहतात.”, असे शबाना आझमी यांनी सांगितले. शिवाय, कुरानही तिहेरी तलाकला परवानगी देत नाही, असेही शबाना आझमी म्हणाल्या.