...जेव्हा पंतप्रधानांनाही शाबासकी मिळते!
एबीपी माझा वेब टीम | 28 May 2016 10:21 AM (IST)
मॉफलांग : देशातील प्रत्येक लहान मोठ्या गोष्टींबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अनेकांना शाबासकीची थाप दिलेली आपण पाहिलेली आहे. पण एका आदिवासी कलाकाराने चक्क मोदींची पाठ थोपटून त्यांना शाबासकी दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज मेघालयमधील मॉफलांग या गावात भेट दिली. आशियातील स्वच्छ गाव अशी मॉफलांगची ओळख आहे. मोदींनी यावेळी तिथल्या आदिवासींच्या पारंपरिक वाद्यांच्या आनंद लुटला. तसंच त्यांनी या वाद्यांवर हात साफ केला. मोदींनी अदिवासींचं पारंपरिक वाद्य असेलला ढोल वाजवण्याचा प्रयत्न केला. मात्र मोदी ते योग्य पद्धतीने वाजवत नसल्याचं बाजूलाच असलेल्या एका आदिवासी कलाकाराने सांगितलं. या आदिवासी कलाकाराने स्वत: मोदींना वाजवून दाखवलं. नंतर मोदींनी ढोल वाजवण्याचा प्रयत्न केला. यावेळी मोदींनी व्यवस्थित वाजवल्याचं सांगत कलाकाराने त्यांची पाठ थोपटली. स्वत: पंतप्रधानांनी हा घटनेचा व्हिडीओ ट्विटरवर शेअर केला आहे. देशाच्या मालकाने माझ्यासारख्या प्रधानसेवकाची पाठ थोपटून शाबासकी देणं, यापेक्षा सौभाग्य काय असू शकतं, असं त्यांनी ट्वीटमध्ये लिहिलं आहे. पाहा व्हिडीओ https://twitter.com/narendramodi/status/736495865850789890