टैग्स : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज आशिया खंडातील सर्वात स्वच्छ गावाला भेट देऊन 'खासी' या आदिवासी समाजातील लोकांशी चर्चा केली. मोदींच्या मेघालय दौऱ्याता आज शेवटच्या दिवस आहे. पंतप्रधान मोदी आज आशियातील सर्वात स्वच्छ गाव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मॉफलांग या गावात दाखल झाले.


 

 

यावेळी त्यांनी आदिवासींचे पारंपरिक वाद्यांच्या वादनाचा आनंद घेऊन 'चाय पे चर्चा' केली. तसंच ते स्वच्छ भारत अभियानाशी जोडलेल्या काही नागरिकांचा गौरवदेखील करणार आहेत.

 



यापूर्वी पंतप्रधानांनी शिलाँगमधील सर्वात मोठे पर्यटन स्थळ असलेल्या एलिफंटा फालचा दौरा केला. तसंच, रामकृष्ण केंद्राच्या कार्यक्रमात सहभाग घेऊन तरुणांना संबोधित केलं. या कार्यक्रमात बोलताना त्यांनी स्वामी विवेकानंदांचे विचार जीवनात उतरवण्यावर विशेष भर दिला.

 

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी पूर्वोत्तर परिषदेच्यावतीने शिलाँगमध्ये आयोजित 65व्या चर्चासत्राचं उद्घाटन केलं. यावेळी त्यांनी पुर्वोत्तरच्या विकासासाठी केंद्र सरकार सदैव कटीबद्ध असून महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी एका विशेष पॅकेजची घोषणा केली.

 

 

पंतप्रधानांने या दौऱ्यात शिलाँगमधीलच फुटबॉल स्टेडिअमचं भूमीपूजन केलं. यावेळी बोलताना त्यांनी पूर्वोत्तरच्या क्रीडा प्रेमासोबत खाद्य संस्कृतीचा गौरव केला.