Trending Video: सोशल मीडियावर (Social Media) दररोज नवनवीन व्हिडिओ शेअर केले जातात. यातील काही व्हिडिओ प्रचंड व्हायरल होतात. सध्या सोशल मीडियावर एका लहान मुलाचा व्हिडिओ व्हायरल होताना दिसत आहे. ज्यात एका लहान मुलानं चक्क पैलवानाला हरवल्याचं पाहायला मिळत आहे. सोशल मीडियावर या व्हिडिओला मोठी पसंती मिळत आहे.
जिममध्ये जाणारे किंवा बॉडीबिल्डर सहसा आपली ताकद दाखवताना दिसतात. बऱ्याच वेळा ते समोरच्याला कमी लेखतात,असे सर्वसाधारणपणे दिसून येते. व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये एक पैलवान लहान मुलासमोर पूशअप करताना दिसत आहे. तसेच त्या लहान मुलाला पुशअप करण्यासाठी चॅलेंज करताना दिसत आहे. या पैलवानाचं चॅलेंज स्वीकारून त्यानं केवळ हातान पुशअप करायला सुरुवात केली. त्यानंतर त्या ठिकाणी उपस्थित असलेले सर्वजण त्या लहान मुलाचं कौतुक करू लागले. हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहून युजर्सही आश्चर्यचकित झाले आहेत.
व्हिडिओ-
हे देखील वाचा-
- ITBP Viral Video : 15 हजार फूट उंची अन् हाडं गोठवणारी थंडी; ITBP च्या जवानांचा बर्फात खडा पहारा
- PM मोदी भजन-किर्तनात लीन होतात तेव्हा..! संत रविदास जयंतीनिमित्त दिल्लीत केली पूजा
- Viral video: फरीदाबादमध्ये 12व्या मजल्याच्या बाल्कनीतून लटकून व्यायाम करताना दिसला माणूस, इंटरनेटवर उडाली खळबळ
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha