आमदार संगीत सोम यांच्या या वक्तव्यामुळे वादाला तोंड फुटलं आहे.
आम्ही हा इतिहास बदलू: संगीत सोम
संगीत सोम म्हणाले, “आपण कोणत्या इतिहासाबद्दल बोलत आहोत? ताजमहलचा निर्माता – शाहजहाँने स्वत:च्या वडिलांना कैद केलं होतं. त्याला हिंदू धर्म संपवायचा होता. जर हे आपल्या इतिहासाचे भाग असतील, तर ही आपल्यासाठी दुर्भाग्याची भाग आहे. आम्ही हा इतिहास बदलू”
ओवेसींचा पलटवार
संगीत सोम यांच्या या वक्तव्यानंतर MIM खासदार असदुद्दीन ओवेसींनी पलटवार केला. जर असं असेल तर लाल किल्लाही गद्दारांचं निशाण आहे, त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र लाल किल्ल्यावरुन तिरंगा फडकणार का, असा सवाल ओवेसींनी उपस्थित केला.
https://twitter.com/asadowaisi/status/919775990443683841
ओवेसींनी ट्विट करुन, दिल्लीत हैद्राबाद हाऊसही ‘गद्दार’ने बनवलं होतं. त्यामुळे मोदी परदेशी पाहुण्यांना इथे येण्यापासून रोखतील? गद्दारांनीच लाल किल्ला उभारला होता, तिथून तिरंगा फडकावणं बंद करणार का? असे सवाल उपस्थित केले आहेत.
भाजप नेत्यांकडून सोम यांचं समर्थन
भाजप नेते जीव्हीएल नरसिंह राव यांनी संगीत सोम यांना आपलं मत मांडण्याचा अधिकार असल्याचं म्हटलं आहे.
भारतीय इतिहास विकृत करण्याचा प्रयत्न झालं आहे. हे स्मारक विध्वसांचं प्रतिक आहे. त्यामुळे संगीत सोम यांनी मांडलेलं मत हे त्यांचं अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे, प्रत्येक वक्तव्याबाबत पक्षाची प्रतिक्रिया आवश्यक नसते, असं जीव्हीएल नरसिंह राव म्हणाले.