या दोघांना खतरनाक स्टंटचा व्हिडीओ सोशल मीडियावर अपलोड करुन लाईक्स मिळवायचे होते. मात्र बिनडोकपणामुळे त्यांचा जीव गेला.
दोन्हीही विद्यार्थी दिल्लीतील मयूर विहार परिसरातील रहिवाशी होते. दोघेही एकाच वर्गात शिकत होते.
दोघेही शनिवारी संध्याकाळी स्टंटबाजीसाठी अक्षरधाम रेल्वे स्टेशनवर पोहोचले. दोघांनी चांगला प्रोफेशनल कॅमेराही भाड्याने घेतला होता. एकूण सात जण स्टंटबाजीसाठी रेल्वे स्टेशनवर आले होते.
सर्वात आधी शुभम आणि यश हे रेल्वेट्रॅकवर उभे राहिले. उर्वरीत मित्र व्हिडीओ बनवत होते. समोरुन ट्रेन आल्यानंतर दोघेही ट्रॅकबाहेर उडी मारणार होते.
मात्र ट्रेन वेगात आली आणि दोघांना उडी घेणं जमलंच नाही. त्यामुळे धावती ट्रेन दोघांना उडवून निघून गेली. यामध्ये दोघांचाही मृत्यू झाला.
दरम्यान, पोलीस सध्या या प्रकरणाची चौकशी करत आहेत. या मुलांनी यापूर्वीही अशी स्टंटबाजी केल्याचं सांगण्यात येत आहे.
VIDEO: व्हिडीओसाठी क्लिक करा