कानपूर : इंदूर- पाटणा एक्स्प्रेस दुर्घटनेत जखमी झालेल्या पीडितांना रुग्णालयात हजार आणि पाचशेच्या जुन्या नोटांची वाटप करण्यात आल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. रेल्वेकडून या नोटा वाटप करण्यात आल्याचा आरोप जखमींनी केला आहे.

रेल्वेने मात्र हा आरोप फेटाळला असून प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. या दुर्घटनेतील जखमींना सरकारी रुग्णालयात भरती करण्यात आलं आहे. त्या ठिकाणी रेल्वेकडून मदत दिली असल्याचं सांगत जखमींना पैसे वाटप करण्यात आले.

इंदूरहून पाटण्याच्या दिशेने जाणाऱ्या पाटणा-इंदूर राजेंद्रनगर एक्स्प्रेसचे 14 डबे रुळावरुन घसरले. या दुर्घटनेत आतापर्यंत 122 प्रवाशांना प्राण गमवावे लागले असून 200 हून अधिक जण गंभीर जखमी आहेत.

दरम्यान जखमींना मदत करण्याऐवजी अज्ञातांकडून जुन्या नोटा वाटप करण्यात आल्याने संताप व्यक्त केला जात आहे.

संबंधित बातमी : 'डबे घसरले नि डोळ्यादेखत त्या चिमुरडीच्या शरीराचे दोन तुकडे'