नवी दिल्ली : सर्वसामान्यांनाच्या खर्चाला दिलासा मिळणार आहे. लवकरच केबल टीव्ही आणि डीटीएच वापरणं स्वस्त होणार आहे. ट्राय अर्थात टेलिकॉम रेग्युलेटरी ऑथोरिटी ऑफ इंडियाकडे केबल आणि डीटीएच दिवसेंदिवस महाग होत असल्याची तक्रार आली आहे.


ट्राय आता याबाबतचे दर कमी करण्यासाठी विचारमंथन करत आहे. ट्रायने 30 सप्टेंबरपर्यंत सर्व स्टेक होल्डर्सकडून याबद्दलची मतं मागवली आहेत. यावर्षीच्या 1 जानेवारीपासूनच केबल आणि डीटीएचचे नवे दर देशभरात लागू झाले होते.

DTH Rates | केबल, डीटीएचच्या वाढीव दरावर ट्रायचं विचारमंथन, 1 जानेवारीपासून लागू केलेल्या दरावर आक्षेप | ABP Majha



ट्रायने वाहिनींकडून देण्यात येणारे पॅक, त्यावरुन दिली जाणारी सूट, तर पॅकमधील वाहिनीची आवश्यकता आणि विक्री किंमत यावर मतं मागितले आहे. या व्यतिरिक्त नेटवर्क कनेक्शन फी आणि दीर्घकालीन योजनांचा आढावा घेण्यात येईल.

16 सप्टेंबरपर्यंत लोकं यावर आपला सल्ला देतील. तर प्रतिवाद सादर करण्याची अंतिम तारीख 30 सप्टेंबर आहे.

संबंधित बातम्या

नेटवर्क नसलं तरी चिंता नाही, वायफायने कॉल करता येणार!

केबलचालक वि. ट्राय : ग्राहकांचा फायदा होईल काय? | माझा विशेष 

सर्व कंपन्यांचे प्लॅन एकाच ठिकाणी, 'ट्राय'ची नवी वेबसाईट