Top Tweets in Government : वर्षाची सुरुवातच कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने झाली तर आता वर्ष संपताना ही लाट आटोक्यात आल्याचं दिसतंय. या काळात ऑक्सिजनच्या अभावी देशातील नागरिकांना अनेक अडचणींनी सामोरं जावं लागलं. तसेच पहिल्या लाटेपेक्षा दुसऱ्या लाटेमध्ये रुग्णसंख्या ही मोठ्या प्रमाणात वाढली. कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी देशात लसीकरणाची गती वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला. या काळात देशातील नागरिकांमध्ये कोरोना लसीकरणाबद्दल जागरुकता निर्माण व्हावी म्हणून स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लस घेतली आणि त्याचा फोटो ट्वीट केला. सरकारकडून शेअर करण्यात आलेल्या या ट्वीटला सर्वाधिक रीट्वीट मिळाले आहेत. तर गाबा कसोटी जिंकल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी टीम इंडियाचं अभिनंद केलं होतं. त्या ट्वीटला सर्वाधिक लाईक्स मिळाले आहेत. 


ट्विटरने या वर्षी सर्वाधिक रीट्वीट झालेल्या आणि सर्वाधिक लाईक करण्यात आलेल्या ट्वीट्सची माहिती दिली आहे.  #OnlyOnTwitter या नावाने त्यांनी ही माहिती प्रकाशित केली आहे. 


सरकारचे सर्वाधिक रीट्वीट झालेले ट्वीट
या वर्षी मार्च महिन्याच्या 1 तारखेला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एम्समध्ये कोरोना लसीचा पहिला डोस घेतला. कोरोनाविरोधातल्या लढाईमध्ये देशातल्या डॉक्टर, शास्त्रज्ञ आणि वैद्यकीय कर्मचार्‍यानी दिलेल्या योगदानाबद्दल त्यांनी आभार मानले. 


 






सरकारचे सर्वाधिक लाईक झालेले ट्वीट
टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाविरोधात गाबा टेस्टमध्ये मिळवलेल्या ऐतिहासिक विजयाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदींनी टीम इंडियाचे ट्वीट करुन अभिनंदन केलं होतं. त्यांनी केलेलं हे ट्वीट सर्वाधिक लाईक करण्यात आलं आहे. हे ट्वीट 19 जानेवारीचं आहे. 


 






संबंधित बातम्या :