Golden Tweets of 2021 : कोरोनाच्या चिंतेत गेलेले 2021 वर्ष संपत आले आहे. या वर्ष एकमेकांशी जुळणे, संपर्क साधणे गरजेचे होते. भारतातील कोरोना संसर्गाच्या लाटेत ट्विटर (Twitter) द्वारे अनेकांना संपर्क साधण्यासाठी आणि प्रतिक्रिया देण्यासाठी चांगलं व्यासपीठ उपलब्ध झाले. या काळात #WeMetOnTwitter, #Tokyo2020, #CricketTwitter यांसारखे हॅशटॅगद्वारे भारतीयांनी आपली मते मांडली. 2021 या वर्षातील चढ-उतारांमुळे, लोक संभाषणात सांत्वन मिळवण्यासाठी ट्विटरकडे वळले. आम्ही 2021 संपत असताना, भारतात ट्विटरवर वर्चस्व गाजवणारे आवाज, ट्रेंड आणि क्षणांवर एक नजर टाकूयात...
सर्वाधिक रिट्विट केलेले ट्विट (Most Retweeted Tweet) : पॅट कमिन्स' (@patcummins30) भारतातील 'कोविड रिलीफ'साठी दिलेल्या देणगीचं ट्विट
भारतावर कोविड-19 च्या दुसऱ्या लाटेचा परिणाम झाल्यानंतर जगभरातून लोक भारताला पाठिंबा देण्यासाठी पुढे आले. त्यापैकी ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू पॅट कमिन्स (@patcummins30). पॅट कमिन्सने भारताला कोविड रिलीफसाठी देणगी दिली आणि इतरांनाही असे करण्यास प्रोत्साहित करण्यासाठी ट्विट केले. कमिन्सच्या या ट्विटला भारतीयांनी कृतज्ञता व्यक्त करत सर्वाधिक रिट्विट केले. त्यामुळे पॅट कमिन्सचे हे ट्विट भारतातील सर्वाधिक रिट्विट केलेले ट्विट बनले.
सर्वाधिक लाईक करण्यात आलेले ट्विट (Most Liked Tweet) : विराट कोहलीच्या (@imVkohli) घरी चिमुकलीच्या आगमनाचे ट्विट
2021 वर्षाच्या सुरुवातीला क्रिकेटर विराट कोहली (@imVkohli) आणि त्याची पत्नी, अभिनेत्री अनुष्का शर्मा (@AnushkaSharma) यांच्या घरी चिमुकलीचं आगमन झालं. त्यांच्या मुलीच्या जन्माची घोषणा करणारे कोहलीचे ट्विटला चाहत्यांनी आणि संपूर्ण भारताने उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. ज्यामुळे ते 2021 चे सर्वाधिक पसंत केलेले ट्विट बनले. गेल्या वर्षी, विराट कोहलीचे (@imVkohli) अनुष्का शर्माच्या गरोदरपणाची घोषणा करणारे ट्विट 2020 वर्षातील 'सर्वाधिक लाइक केलेले ट्विट' ठरले.
सर्वाधिक ट्विट झालेले सरकारचे ट्विट(Most Retweeted Tweet in Government) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे (@narendramodi) लस घेतानाचे ट्विट
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी (@narendramodi) त्यांना कोरोना लसीचा पहिला डोस घेतानाचे ट्विट वर्षातील सरकारचे सर्वाधिक रिट्विट केलेले ट्विट बनले. या ट्विटमध्ये डॉक्टर, शास्त्रज्ञ आणि वैद्यकीय कर्मचार्यांचे कोविड-19 लढाईत योगदान दिल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आहे.
सर्वाधिक ट्विट झालेले व्यावसायिक क्षेत्रासंबंधित ट्विट (Most Retweeted Tweet in Business 2021) : रतन टाटा यांचे (@RNTata2000) टाटा समुहाला एअर इंडियाच्या मालकी परत मिळाल्याचा आनंद साजरा करणारे ट्विट
या ऑक्टोबरमध्ये, टाटा समूहाला एअर इंडियाची मालकी पुन्हा मिळाली. जवळपास सत्तर वर्षांच्या टाटा एअरलाईन्स सरकारी मालकीची होती. यांनी टाटा समूहाला एअरलाईन्सची मालकी पुन्हा मिळाल्याबद्दल आनंद व्यक्त करताना, रतन टाटा (@RNTata2000), टाटा सन्सचे अध्यक्ष एमेरिटस यांनी, एअर इंडियाच्या सुरुवातीच्या विमानांच्या चित्रांसह, “वेलकम बॅक, एअर इंडिया” असे ट्विट केले. हे ट्विट रिट्विट केलेले व्यवसायिक ट्विट बनले.
इतर महत्त्वाच्या बातम्या :
Twitter Trends 2021 : 'हे' हॅशटॅग ठरले सर्वाधिक ट्रेंडिग
- 'या' देशात मिळणार दोनपेक्षा अधिक विक ऑफ, काही दिवसच करावं लागणार काम
- CDS बिपिन रावत यांच्या निधनानंतर पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha