नवी दिल्लीः काही वर्षांआधी 26 जूनलाच जनतेचा आवाज दाबण्याचा प्रयत्न झाला होता, मात्र आज देशातला सर्वसामान्य माणूस निर्णय घेतो. अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आणीबाणीवर जोरदार टीकास्त्र सोडलं.


 

'मन की बात'च्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज जनतेशी संवाद साधला. आणीबाणी घोषीत करण्यात आली तो लोकशाहीसाठी काळा दिवस होता. पण हीच आणीबाणी लोकशाहीच्या शक्तीचं सर्वात मोठं उदाहरण असल्याचं मत मोदींनी व्यक्त केलं.

 

लोकशाहितील आजचा काळा दिवस

तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी 26 जून 1975 साली आणीबाणी लागू केली होती. त्याला आज 41 वर्ष पूर्ण होत आहेत. यासंदर्भात 'मन की बात'च्या माध्यमातून टीका करण्याची संधी पंतप्रधानांनी सोडली नाही. आज देशभरात भाजप आणीबाणीचा दिवस काळा दिवस म्हणून पाळत आहे.

 

'मन की बात' मधील 10 ठळक मुद्देः

  1. शेतकऱ्यांप्रमाणेच भारतीय शास्त्रज्ञ देखील अभिमान वाटेल अशी मेहनत घेत आहेत. नुकताच लाँच केलेला उपग्रह भारतीय तरुणांचे कौशल्य आणि आकांक्षा चिन्हांकित करतो.

  2. 'बेटी बचाव, बेटी पढाओ' अभियानाचा सकारात्मक परिणाम दिसत आहे. महिला सर्वच क्षेत्रात चांगलं काम करत असल्याचं दिसत आहे.

  3. भारताच्या भावना कांथ, अवनी चतुर्वेदी आणि मोहना सिंह यांनी इतिहासात पहिल्यांदाच वायू सेनेचं विमान उडवलं. अभिमानास्पद बाब आहे.

  4. 1922 या क्रमांकावर मिस कॉल देऊन आपल्या आवडत्या भाषेत 'मन की बात' ऐकू शकता.

  5. पाणी हेच आपलं जीवन आहे. पाण्याचा एक-एक थेंब वाचवण्याचा प्रयत्न केला पाहिजे.

  6. निवृत्त कर्मचारी देखील स्वच्छ भारत अभियानासाठी त्यांच्या वेतनातील तिसरा हिस्सा देत आहेत. खरोखर कौतुकास्पद गोष्ट आहे.

  7. लोकशाही आपली खरी शक्ती आहे. लोकशाहीला मजबूत करण्यासाठी प्रयत्न करणं गरजेचं.

  8. देशातील सर्वच भागात चांगला पाऊल होत असल्याचं चित्र आहे. येत्या काळातही मान्सून असाच सक्रिय राहिल, असा हवामान विभागाचा अंदाज आहे.

  9. 'मन की बात' वर खूप कमी वेळा टीका झाली. पण टिका होणं शक्य आहे. कारण आपली लोकशाही पद्धत आहे. तुम्हाला 25-26 जून 1975 आठवत असेल. आजच्याच दिवशी लोकशाहीचा आवाज दाबण्याचा प्रयत्न झाला.

  10. आणीबाणीच्या काळात भारतीयांचा आवाज दाबला गेला. मात्र आता भारतातील लोक मोकळेपणाने आपल्या भावना व्यक्त करु शकतात.