नवी दिल्ली : दिल्लीत पाकिस्तानचे उच्चायुक्त अब्दुल बसीत यांनी आयोजीत केलेल्या इफ्तार पार्टीत फुटीरतावादी नेत्यांनी हजेरी लावल्यामुळं सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत.

 

अब्दुल बसीत आणि फुटीरतावादी नेत्यांमध्ये स्वतंत्र काश्मीरच्या मुद्यावर चर्चा झाल्याची दबक्या आवाजात चर्चा आहे. मात्र अब्दुल बसीत यांनी अशी कोणतीही चर्चा झाली नसल्याचं सांगितलं. आम्ही राजकीय चर्चेसाठी नव्हे तर इफ्तार पार्टीचा आनंद लुटण्यासाठी एकत्र जमलो आहोत, असं बसीत म्हणाले.

 

दरम्यान पत्रकारांनी पम्पोरमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यासंदर्भात अब्दुल बसीत यांना विचारलं. मात्र बसीत यांनी दहशतवादी हल्ल्याचा साधा निषेधही व्यक्त केला नाही..