नवी दिल्ली : टूलकिट प्रकरणावरुन देशातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापण्याची शक्यता असून भाजप आणि काँग्रेस या मुद्द्यावरुन आमने-सामने आल्याचं दिसून येतंय. टूलकिट प्रकरणावरुन आता भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा, केंद्रीय मंत्री स्मृती इराणी तसेच भाजप नेते संबित पात्रा यांच्याविरोधात गुन्हा नोंद करावा अशी मागणी काँग्रेसने दिल्ली पोलीस आयुक्तांकडे केली आहे. त्यांच्यावर गुन्हा नोंद न झाल्यास न्यायालयात जाण्याचा इशारा काँग्रेसने दिला आहे. 


काँग्रेस पंतप्रधानांची प्रतिमा मलिन करतंय, भाजपचा आरोप
देशात कोरोनाचे संकट असताना या मुद्द्यावरुन काँग्रेस राजकारण करत आहे, तसेच काँग्रेसकडून पंतप्रधानांची प्रतिमा मलिन करण्यात येत असल्याचा आरोप भाजपने केला आहे. देश कोरोनाशी संघर्ष करत आहे आणि काँग्रेस या मुद्द्याचा राजकीय लाभ घेण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप भाजप नेते संबित पात्रा यांनी मंगळवारी केला होता. 


 




भाजपच्या आरोपाला काँग्रेसचे उत्तर
भाजपने केलेल्या आरोपांना उत्तर देताना काँग्रेसने हे टूलकिट फेक असल्याचा आरोप करत भाजपाच्या नेत्यांविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी दिल्ली पोलीस आयुक्तांकडे केली आहे. जर पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला नाही तर आपण न्यायालयाचा दरवाजा वाजवू असा इशारा काँग्रेसने दिला आहे. 


काय असतं टूलकिट?
टूलकिट हे अशा प्रकारचे दस्तऐवज असते की त्या माध्यमातून एखादा गट आपल्या मोहिमेला पद्धतशीरपणे पुढे घेऊन जाऊ शकतो. दिल्लीत सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाच्या वेळीही अशा प्रकारचे एक टूलकिट चर्चेत आले होते. 


महत्वाच्या बातम्या :