Tomato Fever Symptoms : संपूर्ण देशभरात कोरोना महामारीचे संकट असताना आणखी एका फ्लू ने थैमान घातले आहे. केरळ राज्यात 'टोमॅटो फ्लू' (Tomato Fever) नावाच्या दुर्मिळ विषाणूजन्य आजाराने पाच वर्षांखालील 80 पेक्षा जास्त मुलांना हा संसर्ग झाला आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, केरळमध्ये आधीच 'टोमॅटो फ्लू' (Tomato Fever) किंवा 'टोमॅटो फिव्हर'ची 82 घटनांची नोंद झाली आहे आणि ही संख्या वाढण्याचा अंदाज आहे.


या संदर्भात वैद्यकीय पथकानुसार, टोमॅटो फ्लूची लक्षणे (Tomato Fever Symptoms) तपासली जात आहेत. तसेच, अंगणवाड्यांमधील पाच वर्षांखालील मुलांची तपासणी करण्यासाठी 24 सदस्यांची टीम तयार करण्यात आली आहे.


टोमॅटो फ्लू (Tomato Fever) म्हणजे काय?


टोमॅटो फ्लू (Tomato Fever) हा भारतातील एक सामान्य प्रकारचा विषाणूजन्य संसर्ग आहे. ज्यामध्ये पाच वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना ताप येतो, सहसा पुरळ उठणे, त्वचेची जळजळ होते. या फ्लूमुळे संक्रमित मुलांच्या शरीराच्या अनेक भागांवर फोड येतात, ज्याचा रंग सामान्यतः लाल असतो. म्हणून याला “टोमॅटो फ्लू” किंवा “टोमॅटो फीवर” (Tomato Fever) म्हणतात. सध्या, संसर्ग फक्त केरळमधील कोल्लम जिल्ह्यातील काही भागांमध्ये नोंदवला जातो, परंतु आरोग्य अधिकार्‍यांनी चेतावणी दिली की प्रतिबंधात्मक उपाय न केल्यास, संसर्ग इतर भागातही पसरू शकतो.


टोमॅटो फ्लूची (Tomato Fever) लक्षणे :


उच्च ताप, पुरळ उठणे, त्वचेची जळजळ, आणि हात आणि पाय त्वचेचा रंग बदलतो. फोड येतात. ओटीपोटात पेटके, मळमळ, उलट्या किंवा अतिसार, खोकला, सर्दी थकवा आणि शरीर दुखणे यांसारखी लक्षणं आढळून येतात. 

जरी, आरोग्य अधिकार्‍यांच्या म्हणण्यानुसार, हा विषाणू प्राणघातक नाही आणि त्यावर उपचार केले जाऊ शकतात, तथापि, जर एखाद्या मुलामध्ये तापाची लक्षणे दिसली तर त्यांना त्वरित डॉक्टरांकडे नेले पाहिजे.


अशी काळजी घ्या : 



  • मुलाला फोड स्क्रॅच करू देऊ नका. 

  • संक्रमित मुलाला हायड्रेटेड ठेवा.

  • योग्य स्वच्छता राखा.

  • संक्रमित मुलाशी जवळचा संपर्क टाळा.

  • संक्रमित मुलाला कोमट पाण्याने आंघोळ घाला.

  • रोगाचा दीर्घकाळ टिकणारा परिणाम टाळण्यासाठी मुलाला योग्य विश्रांती घेण्यास सांगा.


महत्वाच्या बातम्या :