नवी दिल्ली : ब्रिटन आणि जपानकडून कोरोना विषाणूच्या संसर्गाला रोखण्यासाठी उचलण्यात आलेली काही महत्त्वाची पावलं पाहता, जागतिक स्तरावर सोनं आणि चांदीच्या दरांमध्ये तेजी पाहायला मिळत आहे. परिणामी भारतीय बाजारावरही याचे थेट परिणाम पाहायला मिळत आहेत. ब्रिटनमध्ये पंतप्रधान बोरिस जॉनसन यांनी कठोर प्रतिबंधात्मक पावलं उचलण्याचा इशारा दिला. तर, जपानमध्ये जवळपास आणीबाणी घोषित करण्यात आली आहे.


एमसीएक्समध्ये सोन्याच्या दरांत वाढ


सोमवारी एमसीएक्स मध्ये सोन्याच्या दरांमध्ये 1.23 टक्क्यांनी वाढ झाली. परिणामी हे दर 50,860 रुपये प्रति दहा ग्रामवर पोहोचले. तर, चांदीचे दर 2.21 टक्क्यांनी वाढल्यामुळं 1,504 रुपयांनी ही वाढ होत दर 69,627 रुपये प्रति दहा ग्राम वर पोहोचले. डॉलर इंडेक्स कमी असल्या कारणानं गुंतवणुकदारांनी याचा फायदा घेत सोन्यातील गुंतवणूक वाढवली. ज्यामुळं सोन्याची मागणी वाढत त्याच्या दरांमध्ये तेजी पाहायला मिळाली.


दिल्लीत शुक्रवारी सोन्याच्या दरांत 20 रुपयांची वाढ झाली. ज्यामुळं हे दर 49,687 वर पोहोचले. प्रति दहा ग्रामसाठी हे दर पाहायला मिळाले. तर, चांदीचे दर 404 रुपयांनी वाढले. जे पाहता प्रति किलो चांदिसाठी 67,520 दर मोजावा लागला. अहमदाबादमध्ये सोमवारी गोल़्ड स्पॉट 50.143 रुपये प्रति दहा ग्रामवर पोहोचले. तर, गोल्ड फ्यूचरची किंमत प्रति दहा ग्राममागे 50829 रुपये इतकी राहिली.


'दीप- वीर'च्या New Year सेलिब्रेशनचे फोटो, व्हिडीओ व्हायरल


लग्नसराईचा संपूर्ण माहोल आणि कोरोना महामारीमुळं अडून राहिलेली शुभकार्य पाहता सर्वसामान्यही सोनं खरेदीला प्राधान्य देत आहेत. पण, यामध्ये सोनं आणि चांदीच्या दरांमध्ये होणारी वाढ मात्र खिशाला चांगलीच कात्री मारताना दिसत आहे. दरम्यान येत्या काळामध्ये कोरोना लसीबाबतच्या चर्चा, घोषणा आणि त्याचे आंतरराष्ट्रीय अर्थव्यवस्थेवर होणारे परिणाम पाहता सोन्याच्या दरांचा आकडा आणखी उसळी घेणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.