नवी दिल्ली : भारताचा 68 वा प्रजासत्ताक दिन आज देशभरात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो आहे. अबूधाबीचे युवराज मोहम्मद बिन झायेद हे यंदाच्या सोहळ्यासाठी प्रमुख पाहुणे आहेत.
यानिमित्त दिल्लीतील राजपथावर देशाच्या लष्करी सामर्थ्याचं आणि सांस्कृतिक वैविध्यतेचं दर्शन घडवलं जाईल. दहशतवाद्यांचे कर्दनकाळ ठरलेले ब्लॅक कॅट कमांडोज आणि संपूर्ण देशी बनावटीचं 'तेजस' हे लढाऊ विमानही पहिल्यांदाच राजपथावरच्या संचलनात सहभागी होत आहेत.
राजपथावरील कार्यक्रमातील 10 नवीन गोष्टी :
1. यूएईचे राजपुत्र प्रमुख पाहुणे
2. यूएईच्या सैनिकांचं संचलन
3. पहिल्यांदाच एनएसजी कमांडोंचं संचलन
4. पहिल्यांदाच दिसणार ऐतिहासिक 'धनुष' तोफ
5. देशी बनावटीचं लढाऊ विमान 'तेजस' प्रदर्शन
6. हेलिकॉप्टर ध्रुवर आणि रुद्र दिसणार
7. एअरबॉर्न अर्ली वॉर्निंग सिस्टमचं प्रदर्शन
8. नोटबंदी आणि डिजिटल इंडियाचा रथ
9. रथ संचलनातू बदलत्या भारताचं चित्रण
10. जीएसटीच्या वैशिष्ट्यांची माहिती देणार