Tiger Attack, Madhya Pradesh : गेल्या काही दिवसांत व्याघ्र प्रकल्पांमध्ये जिप्सीने सफारी करणाऱ्या पर्यटकांचे अनेक व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. दरम्यान, बांधवगढ व्याघ्र सफारी (Tiger Attack) दरम्यान वाघाने जिप्सीवर हल्ल्याचा (Tiger Attack) प्रयत्न केलाय. वाघाने हल्ला (Tiger Attack) करण्यासाठी झाडामागील भागात दबा धरला होता. मात्र, गाईडच्या समयसूचकतेमुळे टळला अनर्थ टळलाय. यातील पर्यटकांचे (Tiger Attack) प्राण वाचवण्यास गाईड यशस्वी ठरलाय.
वाघिणीला बछड्यांसह घेरणारे 4 जिप्सी चालक आणि 4 गाइड निलंबित
उमरेड-पवनी-कहांडला अभयारण्यातील प्रसिद्ध एफ-2 या वाघिणीला तिच्या 5 बछड्यांसह जिप्सी चालक आणि 4 गाईड असलेल्या व्यक्तींकडून घेरण्यात आले होते. रस्तावर असताना तिचे फोटो आणि व्हिडिओ काढण्यासाठी जंगल सफारीवर असलेल्या पर्यटकांच्या जिप्सीनं समोरून व मागून घेरलं होतं. याचा व्हिडिओ समाज माध्यमावर व्हायरल झाल्यानंतर या प्रकरणात जिप्सीचे 4 चालक व 4 गाइड यांना 7 दिवसांसाठी निलंबित केलं आहे. तर जिप्सी चालकांवर अडीच हजार व गाइडला 450 रुपये प्रति व्यक्ती दंड लावण्यात आला आहे.
जिप्सी चालकांनी व गाइडने मंगळवारी (दि.4) या गोठणगाव तलावाजवळ वाघीण व तिच्या 5 बछड्यांसह जात असताना रस्त्यावर बराच वेळ घेरून ठेवलं होतं. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर (Social Media) झाला होता. त्यामुळे पेंच व्याघ्र प्रकल्पाचे उपसंचालक व कऱ्हांडला अभयारण्याचे प्रभारी डॉ. प्रभूनाथ शुक्ला यांनी वनपरिक्षेत्र अधिकारी आरती उईके यांना चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर अभयारण्य प्रशासनानं ही कारवाई केली आहे.
वाघापासून वाहनं 30 मीटर दूर असणं गरजेचं
वन्यजीव तज्ज्ञांच्या मते पेंच, ताडोबा व अन्य व्याघ्र प्रकल्पासह अभयारण्यात येणाऱ्या पर्यटकांच्या वाहनांची गती, वाहनं कुठं थांबतात यावर नियंत्रण ठेवण्यासाठी एक ॲप बनविण्यात आलं आहे. जर नियमांचं उल्लंघन होत असेल तर गुन्हा नोंदविला जातो, जंगलांमध्ये वाघाजवळून कुठलेही वाहन 30 मीटर दूर असलं पाहिजे. वाघाच्या मागेपुढे वाहने उभी करणे हे चुकीचं आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या