पठाणकोट : पंजाबमधील पठाणकोटमध्ये एक संशयित बॅग मिळाली असून, यात सैन्य यात लष्कराचे तीन गणवेश मिळाले आहेत. ही बॅग मिळाल्यानंतर स्वात कमांडोंनी परिसराची झडती घेण्यास सुरुवात केली आहे. सुरक्षा दलांनाही सतर्क राहण्याचे आदेश दिले आहेत.

ही बॅग लष्कराच्या कॅटोमेंट परिसरात मिळाली. यात पाच शर्ट, दोन पॅन्ट आहेत. एका स्थानिकाने पोलिसांना दिली. यानंतर पठाणकोट शहर आणि कॅन्ट भागाचा कसून शोध घेण्यात येत आहे.



पठाणकोटमध्ये भारतीय हवाईदलाचं तळ असून, गेल्यावर्षी याच ठिकाणी दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. दहशतवाद्यांच्या हल्ल्यात भारताचे सात जवान शहीद झाले होते. तर एकूण सहा दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात भारतीय लष्कराला यश आलं होतं.

दरम्यान, काही दिवसांपूर्वीच जम्मू कश्मीरमधील गुप्तहेर संघटनांनी हाय अलर्ट दिला होता.