यामध्ये जैश-ए-मोहम्मद प्रमुख मसूद अझहरचा पुतण्या 'तल्हा रशीद' ठार झाला आहे. त्यामुळे हे सुरक्षा दलाचं मोठं यश मानलं जात आहे.
दक्षिण काश्मीरमधील अलगर कंडीमध्ये दहशतवादी लपून बसल्याची माहिती लष्कराला मिळाल्यानंतर जोरदार शोध मोहीम सुरु करण्यात आली. यावेळी अचानक दहशतवाद्यांनी जवानांच्या दिशेने गोळीबार सुरु केला. यात जवानांनी तीन दहशतवाद्यांना टिपलं.
या हल्ल्यात एक नागरिक दहशतवाद्यांची गोळी लागून जखमी झाला आहे. त्याला तात्काळ रुग्णालयात नेण्यात आलं असून सध्या त्याच्यावर उपचार सुरु आहेत.