उज्जैन : मध्य प्रदेशात दरवर्षी भरणाऱ्या गाढव विक्री आणि प्रदर्शनातील दोघा गाढवांना डेरा सच्चा सौदाचा प्रमुख राम रहीम आणि त्याची निकटवर्तीय हनीप्रित यांची नावं देण्यात आली होती. विशेष म्हणजे या गाढवांची 11 हजार रुपयांना विक्री झाली.


गाढव विक्रेते ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी नेहमीच गाढवांना फॅन्सी नावं देतात. गाढवांची जात किंवा शारीरिक ठेवण यावरुन त्यांची डील होते. राजस्थानातून आलेल्या एका गाढव विक्रेत्याने चक्क आपल्या गाढवांना राम रहीम आणि हनीप्रित अशी नावं दिली.

विक्रेत्याला 20 हजार रुपयांना गाढवांच्या जोडीची विक्री करण्याची इच्छा होती, मात्र घासाघीस करुन 11 हजारांना ती विकण्यात आली.

डेरा सच्चा सौदाचा प्रमुख बाबा राम रहीम बलात्कार प्रकरणी तुरुंगात आहे, तर हिंसाचार भडकवल्याप्रकरणी त्याची दत्तक कन्या हनीप्रित इन्सानवर गुन्हा दाखल आहे.

काही विक्रेत्यांनी आपल्या गाढवांचं नाव जीएसटी, सुलतान, बाहुबली असं ठेवलं होतं.