कोलकाता: प. बंगालमधील सुकना येथे आज सकाळी जवळजवळ 10.30च्या दरम्यान लष्कराच्या हेलिकॉप्टरला अपघात झाला. या अपघातात पायलटसह तीन अधिकाऱ्यांचा मृत्यू झाला. तर एक ज्युनियर अधिकारी गंभीर जखमी झाला आहे.


लष्कराचं हे हेलिकॉप्टर दररोजच्या कामासाठी व्यस्त असतानाचा हा अपघात झाला. दरम्यान याप्ररकणाची चौकशी सध्या सुरु आहे. लष्कराकडून अद्यापही मृत अधिकाऱ्यांचे नाव आणि त्यांच्या रँकबाबत कोणतीही माहिती दिलेली नाही.

हेलिकॉप्टरला अपघात नेमका कशामुळे झाला याबाबत अजूनही कोणतीही माहिती मिळू शकलेली नाही.