नवी दिल्ली : पेट्रोलच्या किमतीत अत्यल्प वाढ, तर डिझेलच्या किमतीत अत्यल्प घट झाली आहे. पेट्रोलचे दर प्रतिलीटर 13 पैशांनी वाढले असून डिझेलच्या किमतीत प्रतिलीटर 12 पैशांनी कपात करण्यात आली आहे.


पेट्रोल-डिझेलचे नवे दर 30 नोव्हेंबरच्या मध्यरात्रीपासून लागू होतील. पंधरा दिवसांपूर्वीच पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत कपात करण्यात आली होती. त्यावेळी पेट्रोलचे दर प्रतिलीटर 1 रुपया 46 पैशांनी, तर डिझेल प्रतिलीटर 1 रुपया 53 पैशांनी स्वस्त झालं होतं.

नोटाबंदीच्या निर्णयानंतर पेट्रोल-डिझेल भरण्यासाठी आलेल्या वाहनचालकांचे सुट्ट्या पैशांवरुन वाद होण्याची शक्यता होती. त्यामुळे पेट्रोलपंपावर जुन्या पाचशे आणि हजारच्या नोटा स्वीकारण्यात येत होत्या.

सप्टेंबर महिन्यापासून पेट्रोल-डिझेलचे दर सातत्याने वाढत जात होते. ऑक्टोबरमध्ये दोन वेळा, तर सप्टेंबरमध्येही 16 तारखेला पेट्रोल-डिझेलचे दर वाढले होते.