जम्मू काश्मिर : जम्मू काश्मिरमधील अनंतनागमध्ये भारतीय सेनेला तीन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात यश आलं आहे. लष्कराचा कमांडर जिबरानसह तिघा जणांचा भारतीय सेनेने खात्मा केला.
सोमवारी संध्याकाळी दक्षिण काश्मिरमध्ये भारतीय सेनेने केलेल्या कारवाईत तिघा दहशतवाद्यांना ठार मारण्यात आलं. शौकत लोहार, मुझफ्फर हजाम हे दोघं लपून बसल्याची माहिती आहे.
पाकिस्तानी एके 47, एक एसएलआर, एक पिस्तुल अशी शस्त्र तिघांकडून जप्त करण्यात आल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. लष्कर आणि हिजबुलने आदल्याच दिवशी भारतावर जोरदार हल्ला चढवण्याचा इशारा दिला होता.
जम्मू काश्मिरमध्ये सैन्याकडून तीन दहशतवाद्यांना कंठस्नान
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
17 Jul 2017 11:42 PM (IST)
जम्मू काश्मिरमधील अनंतनागमध्ये भारतीय सेनेला तीन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात यश आलं आहे. लष्कराचा कमांडर जिबरानसह तिघा जणांचा भारतीय सेनेने खात्मा केला.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -