श्रीनगर : जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये भारतीय सैन्यानं तीन दहशतवाद्यांना कंठस्नान घातलं आहे. तसंच दहशतवाद्यांकडून तीन AK 47 ही ताब्यात घेण्यात आल्या आहेत.
कालपासून या दहशतवाद्यांशी सैन्याकडून चकमक सुरु होती. मात्र आज सकाळी सैन्याला या तीनही दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात यश आलं आहे. पहलगामच्या खानबालमध्ये सैन्यानं ही कारवाई केली आहे. हे दहशतवादी स्थानिक आहेत की परदेशी हे अद्याप समजू शकलेलं नाही. मात्र ही मोठी कारवाई असल्याचं भारतीय सैन्याकडून सांगण्यात आलंय.
दरम्यान काश्मीरच्याच अनंतनागमध्येही काही दहशतवादी लपल्याची माहिती समोर आली होती. त्यांच्यासोबत कालपासून सैन्याची चकमक सुरु होती.
संबंधित बातम्या :
काश्मीरच्या अनंतनागमध्ये दहशतवाद्यांसोबत सैन्याची चकमक सुरु