नवी दिल्ली : आर्मी डेच्या पार्श्वभूमीवर नवी दिल्ली इथे सुरु असलेल्या आर्मी परेडच्या सरावादरम्यान अपघात घडला. ध्रुव हेलिकॉप्टरमधून उतरण्याचा सराव करताना दोरखंड तुटला आणि तीन जवान खाली कोसळले.


जवानांना दुखापत झाली असली तरी ते सुरक्षित आहेत. मात्र यापैकी कोणालाही गंभीर इजा झाली नसल्याचं भारतीय सैन्याकडून सांगण्यात आलं आहे.

जवानांच्या सरावाचा व्हिडीओ समोर आला आहे. ध्रुव हेलिकॉप्टरमधून जवान उतरत असताना दोरखंड तुटला आणि जवान खाली कोसळल्यातं दिसत आहे. हा अपघात मंगळवारी झाल्याचं म्हटलं जात आहे.

भारतीय सैन्याचे पहिले कमांडर इन चीफ लेफ्टनंट जनरल केएम करियप्पा यांच्या सन्मानार्थ 1949 पासून आर्मी डेची सुरुवात करण्यात आली. तेव्हापासून दरवर्षी सर्व कमांड हेडक्वॉर्टर आणि राजधानी दिल्लीत आर्मी परेड आणि अन्य कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं. त्याआधी ब्रिटीश वंशाचे फ्रान्सिस बूचर हे भारताचे शेवटचे लष्करप्रमुख होते.

या निमित्ताने आयोजित परेड आणि शस्त्रास्त्रांच्या प्रदर्शनाचा उद्देश जगाला आपली ताकद दाखवून देण्यासाठी आणि देशातील तरुणांना सैन्यात सामीत करण्यासाठी प्रेरित करण्याचा असतो.

पाहा व्हिडीओ