नवी दिल्ली : एकीकडे देशात कोरोनाचा प्रादुर्भाव काही केल्या कमी येत नाही तर दुसरीकडे आणखी एक चिंता वाढत आहे. देशातील काही राज्यांत आता म्युकोरमायकोसिस अर्थात ब्लॅक फंगसचा (Black Fungus) धोका वाढताना दिसत आहे. कोरोनातून बरे झालेले रुग्ण, खासकरुन ज्यांना डायबेटिसचा त्रास आहे अशा लोकांना ब्लॅक फंगसची लागण होत आहे. 


कोणत्या राज्यात Black Fungus चा प्रसार होतोय? 
उत्तर प्रदेशमधील अनेक जिल्ह्यामंध्ये Black Fungus चा धोका वाढताना दिसत आहे. तसेच हरयाणामध्येही दोन रुग्ण सापडल्याचं समोर आलं आहे. बिहार आणि महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर Black Fungus चे रुग्ण आढळतात. त्याचप्रमाणे ओडिशा आणि राजस्थान तसेच गुजरातमध्येही हे रुग्ण मोठ्या प्रमाणावर आढळतात. Black Fungus ची लागण झाल्यामुळे अनेक लोकांना आपली दृष्टी गमवावी लागली आहे. मध्य प्रदेशात Black Fungus संबंधी परिस्थिती चिंताजनक बनली आहे. 


आयसीएमआरने गेल्या आठवड्यात काही सूचना जारी केल्या असून त्यामध्ये सांगण्यात आलं आहे की, हा संसर्ग झाल्यास डोळे, गाल आणि नाक यांच्यावर परिणाम होतो. Black Fungus मुळे फुफ्फूसांना संसर्ग होतो आणि श्वासोश्वासातमध्ये अडचणी येतात. 


या आजारावर लवकर उपचार केले नाही तर श्वसन, मेंदू, डोळ्यांवर विपरित परिणाम होत असल्याचे निदर्शनास येत आहेत. या आजाराचे लवकर निदान होणं गरजेचं असल्यानं त्याबाबत नागरिकांमध्ये जागृती करणे आवश्यक आहे.


काय आहे  Black Fungus संसर्ग? 
कोरोना उपचारादरम्यान वापरल्या जाणाऱ्या औषधांमुळे रोगप्रतिकारशक्ती कमी होते.  सामान्यतः श्वास घेताना युब्युक्युटस नावाचे जीवाणू नाकामध्ये जातात. परंतु रोगप्रतिकार शक्ती संतुलीत नसेल तर म्युकोरमायकॉसिस या बुरशीची वाढ होते.  कोरोनानंतर व्यक्तीमधील रोगप्रतिकारशक्ती कमी झालेली असते. तसेच मधुमेह किंवा इतर सहव्याधी असलेल्या लोकांमध्ये या बुरशीच्या संसर्गाची शक्यता आहे.


Black Fungus ची लक्षणे काय?
चेहऱ्यावर सूज येणे, गाल दुखणे, डोळे दुखणे, डोळ्यांना सूज येणे, डोके दुखणे, नाक दुखणे, रक्ताळ किंवा काळसर जखम ही सर्व म्युकोरमायकॉसिसची लक्षणं आहेत. 


या रोगापासून बचाव कसा करायचा? 
कोरोनातून बरं झाल्यानंतर त्या व्यक्तीने आपल्या शरीरातील साखरेचं प्रमाण सातत्यानं तपासावं. कोणत्याही औषधांचे सेवन करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. आयसीएमआरच्या निर्देशकांचे पालन करावं. 


महत्वाच्या बातम्या :