पैसे जाळणारा माणूस, दिवाळीनिमित्त भन्नाट व्हिडीओ व्हायरल
एबीपी माझा वेब टीम | 31 Oct 2016 10:19 PM (IST)
मुंबई: सध्या दिवळीची धूम सर्वत्र आहे. प्रत्येकजण दिवाळीचा आनंद फटाके फोडून साजरा करत आहे. पण या फटाक्यामुळे होणाऱ्या प्रदूषणाकडे सर्वचजण दुर्लक्ष करतात. त्यामुळे, वरुण पृथी या तरुणाने एका व्हिडीओच्या माध्यमातून सामाजिक संदेश देत, पर्यावरणपूरक दिवाळी साजरी करण्याचा संदेश दिला आहे. सोशल मीडियावरुन याचा व्हिडीओ कमालीचा व्हायरल होतो आहे. या व्हिडीओत हा तरुण पैसे जाळताना दिसत आहे. हे पाहून शेजारुन जाणारी एक व्यक्ती त्याला वेड्यात काढण्याचा प्रयत्न करते. पण तोच तरुण त्या व्यक्तीच्या हातातील फटाक्याची माळ दाखवत तूही पैसे जाळत असल्याचे सांगतो. तसेच दिवाळीत फटाक्यांवर पैसे करुन पर्यावरणाला नुकसान पोहचवण्यापेक्षा ज्यांना दिवाळी साजरी करताना येत नाही त्यांना देण्याचे आवाहन करण्यात येत आहे. वरुण पृथी या तरुण अभिनेत्याने या आधीही असे सामजिक संदेश देणारे अनेक व्हिडीओ यूट्यूबवर पोस्ट केले होते. त्यातून त्याने विविध मुद्द्यावर कोपरखळ्या मारत समाज जागृतीची मोहीम राबवली आहे. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर कमालीचा व्हायरल होत असून या व्हिडीओला यूट्यूबवर पोस्ट केल्यापासून 1 लाखाहून अधिकांनी पाहिला आहे. व्हिडीओ पाहा